जिल्हास्तरीय बॅडमिंटन अजिंक्यपद स्पर्धेत यश भोंगले दुहेरी विजेते पदाचा मानकरी!

स्पर्धेत विनीत पाटील बॅडमिंटन अकॅडमीचे यश


रत्नागिरी : बॅडमिंटन एसोसिएशन ऑफ संगमेश्वर तालुका आयोजित करण्यात आलेल्या जिल्हास्तरीय बॅडमिंटन अजिंक्यपद स्पर्धेत विनित पाटील बॅडमिंटन अकादमीचा विद्यार्थी यश भोंगले याने १५ वर्षाखालील वयोगटात सिंगल्स व डबल्स असे दोन्ही विजेतेपद आणि १७ वर्षाखालील वयोगटात उपविजेतेपद पटकावले. दि. २८ व २९ जानेवारी रोजी देवरुख येथे ही स्पर्धा झाली.


या स्पर्धेत विनित पाटील बॅडमिंटन अकादमीचा आणखी एक विद्यार्थी सिद्धेश फणसेकर १९ वर्षाखालील वयोगटात उपविजेता ठरला. याचबरोबर स्वतः विनित पाटील यांनीही मेन्स डबल्समध्ये सुधीर कुमार यांच्यासह खेळताना विजेतेपद पटकवले.

जिल्हास्तरीय बॅडमिंटन स्पर्धेतील विजेते विनीत पाटील अकॅडमीचे श्री.विनीत पाटील, यश भोंगले आणि सिदेश फणसेकर.
Digi Kokan
Author: Digi Kokan

Leave a Comment

READ MORE

READ MORE