बाळ विघ्नहर्ता माघी गणेशोत्सव मंडळ पिरकोनतर्फे माघी गणेशोत्सव उत्साहात साजरा

उरण (विठ्ठल ममताबादे ) : उरण तालुक्यातील पिरकोन येथे सन 2001 साली बाळ विघ्नहर्ता माघी गणेशोत्सव मंडळाची स्थापना झाली. 2001 पासून या मंडळातर्फे दरवर्षी मोठ्या भक्तीभावाने माघी गणेशोत्सव साजरा केला जातो. यंदाचे माघी गणेशोत्सवाचे हे 23 वे वर्ष आहे. दरवर्षी गणेशोत्सवाच्या माध्यमातून विविध सामाजिक उपक्रमांचेही आयोजन पिरकोन मध्ये केले जाते. यावर्षी बुधवार 25 जानेवारी 2023 ते सोमवार 30 जानेवारी 2023 पर्यंत माघी गणेशोत्सव मोठ्या उत्साहात मंडळातर्फे साजरी करण्यात आली.

या मंडळात पदाधिकारी व सदस्य हे लहान मूले आहेत.लहान मुले या माघी गणेशोत्सवचे उत्तम आयोजन, नियोजन करत असतात.इतर ज्येष्ठ व्यक्ती या पदाधिकाऱ्यांना, सदस्यांना मार्गदर्शन करित असतात. या मंडळांचे वैशिष्ट्ये म्हणजे लोकवर्गणीतून समाजासाठी 24 तास एम्ब्युलन्स उपलब्ध करून देण्यात आलेली आहे. गोरगरिब जनतेला या एम्बुलन्सचा खूप मोठ्या प्रमाणात फायदा होत आहे. मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष – बारकनाथ जोशी, उपाध्यक्ष मणिराम गावंड , सदस्य जगदिश पाटील, हरिभाऊ म्हात्रे, रामचंद्र पाटील, कैलास पाटील,मनोहर जोशी, विनोद म्हात्रे यांच्यासह बाळ विघ्नहर्ता माघी गणेशोत्सव मंडळ पिरकोन व ग्रामस्थ मंडळ पिरकोनचे सर्व पदाधिकारी कार्यकर्ते यांनी माघी गणेशोत्सव यशस्वी करण्यासाठी विशेष मेहनत घेतली आहे.

सोमवार दि. 30 जानेवारी रोजी गणेशमूर्तीचे विसर्जन करून श्रीगणेशाला भावपूर्ण निरोप देण्यात आला. गणपती बाप्पा मोरया पुढच्या वर्षी लवकर या अशी आर्त हाक यावेळी बालभक्तांनी दिली.

Digi Kokan
Author: Digi Kokan

Leave a Comment

READ MORE

READ MORE