देवरूख( सुरेश सप्रे) : कोकणातील जनता उद्धव ठाकरे यांच्याच शिवसेनेसोबत ठामपणे उभी आहे. येत्या लोकसभा निवडणुकीत जनतेच्या आर्शिवादानेच गद्दारांना गाडून गतवैभव परत मिळवून भाई विजयाची हॅटट्रिक साधत हा गड सेनेचा असल्याचे सिद्ध करून दाखविल्याशिवाय आम्ही गप्प बसणार नाही, असा आत्मविश्वास माजी आमदार
सुभाष बने यांनी व्यक्त केला.
रत्नागिरी – सिंधुदुर्गचे खासदार व उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेचे सचिव विनायक राऊत यांचा वाढदिवसानिमित्त उ. भा. ठाकरे शिवसेने तर्फे देवरूख मराठा भवन येथे आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमात ते बोलत होते..
यावेळी व्यासपीठावर माजी मंत्री रविंद्र माने, जिल्हा संपर्कप्रमुख सामोरे. सहसंपर्कप्रमुख राजू महाडीक जिल्हा प्रमु़ख विलास चाळके, सचिन कदम. महिला संघटक सौ. नेहा. माने. सौ. वेदा फडके, जगदिश राजापकर, जयसिंग घोसाळे. बंड्यासाळवी, राष्ट्रवादी काँग्रेसचे बारक्याशेट बने, हनिफ हरचिरकर आदी मान्यवर उपस्थित होते.
खासदार हा कसा लोकाभिमुख असतो हे भाईंनी घरात न थांबता या मतदारसंघातील गावागावात, वाडीवस्तीत फिरून जनतेच्या भावनांची कदर करत त्याचे मागे उभा राहतो. दाखवून दिले आहे. या कोकणी जनतेचा आशीर्वाद आहेच. आपण हि हेवेदावे. मान सन्मान बाजूला ठेवून एकदिलाने काम करून गद्दारांना धडा शिकवून रत्नागिरी- सिंधुदुर्ग मतदारसंघ हा बाळासाहेबांवरच प्रेम करतो सिद्ध करणेसाठी कटिबद्ध होवू या असे आवाहन बने यांनी केले.
या वाढदिवसाचे औचित्य साधून जिल्ह्य़ातील विविधक्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्यांचा गौरविण्यात आले.. त्यात चिपळुणच्या पोलिस अधिकारी सौ. करमरकर. कँरमपटू कु. आकांक्षा कदम. रांगोळी रेखाटन करत गिनीज बुकात नोंद झालेला देवरूखचा सुपुत्र विलास सुवारे यांचा खा. राऊतांच्या हस्ते सत्कार करणेत आला.
यावेळी खा. राऊत यांना शुभेच्छा देण्यासाठी राजापूर. लांजा. रत्नागिरी. संगमेश्वर व चिपळुण मधिल उबाठा सेनेच्या पदाधिकारी कार्यकर्त्यांनी मोठी गर्दी केली होती…

