रत्नागिरीत २६ मार्चला सामूहिक रामरक्षा पठण आणि रामनाम जप

ओम् साई मित्र मंडळाकडून आयोजन


रत्नागिरी : श्रीरामनवमी निमित्त ओम् साई मित्र मंडळातर्फे रविवार, २६ मार्चला सायंकाळी ६ वाजता रत्नागिरीत मंडळाच्या साळवी स्टॉप – नाचणे लिंक रोड वरील सभागृहात सामूहिक श्रीरामरक्षा पठण आणि श्रीरामनाम जप यांचे आयोजन करण्यात आले आहे.


श्रीरामरक्षा हे प्रासादिक स्तोत्र त्यातील गेयता आणि लयबद्धता यांमुळे अतिशय लोकप्रिय असून त्याचा पाठ घरोघरी नित्यनेमाने केला जातो. उत्तम आयुरारोग्य आणि संकटमुक्ती यांसाठी या स्तोत्राचा पाठ भाविक अतिशय श्रद्धेने आणि भावपूर्णपणे करत असतात.

या स्तोत्राच्या सामूहिक पठणाचेही अनेक लाभ आहेत. प्रभू श्री रामचंद्रांच्या आदर्श रामराज्याच्या धर्तीवर धर्म, राष्ट्र आणि समाज यांच्या उन्नतीसाठी सामूहिक उपासना शीघ्र फलदायी ठरते. याच उद्देशाने ओम साई मित्र मंडळातर्फे सामूहिक श्रीरामरक्षा पठण आणि श्रीरामनाम जप यांचे रविवार, २६ मार्च या दिवशी सायंकाळी ६ वाजता मंडळाच्या सभागृहात आयोजन करण्यात आले आहे. यामध्ये बाल, युवा, माता, भगिनी, वृद्ध यांसह सर्व धर्मप्रेमी, राष्ट्रप्रेमी आणि श्रीरामभक्त आदी सर्वांनी सहभागी व्हावे, असे आवाहन ओम साई मित्र मंडळातर्फे करण्यात आले आहे.

Digi Kokan
Author: Digi Kokan

Leave a Comment

READ MORE

READ MORE