बाल्मर लॉरीमधील कलमार ऑपरेटसर्ना वेतनवाढ

कामगार नेते महेंद्र घरत यांची यशस्वी मध्यस्थी

उरण (विठ्ठल ममताबादे ) : सध्याची परिस्थीती पाहता कंपनीही चालली पाहिजे व कामगारहि जगला पाहिजे यासाठी समन्वय साधून वाढलेली महागाई पाहता कामगारांचे जीवन सुकर व्हावे, हा उद्देश ठेवून न्यू मेरीटाईम ऍण्ड जनरल कामगार संघटनेचे अध्यक्ष कामगार नेते महेंद्रजी घरत हे कामगारांसाठी पगारवाढीचे करार करत असतात. कामगार नेते महेंद्र घरत यांच्या मार्गदर्शनाखाली संघटनेची यशस्वी घोडदौड सुरूच आहे. संघटनेच्या माध्यमातून या वर्षीचा चौथा पगारवाढीचा मे. अपना लॉजिस्टीक्स ( बाल्मर लॉरी भेंडखळ ) या कंपनीतील कलमार ऑपरेटर्स व हेल्पर यांना ५५००/- रुपये पगारवाढीचा करार करण्यात आला.

या करारनाम्यानुसार कामगारांना एक ग्रॉस सॅलरी बोनस तसेच २ लाख रुपयांची मेडिक्लेम पॉलिसी देण्याचे मान्य करण्यात आले.यामुळे कामगार वर्गात आनंदाचे वातावरण पसरले आहे.

या करारनाम्या प्रसंगी NMGKS संघटनेचे अध्यक्ष कामगार नेते महेंद्रजी घरत, सरचिटणीस वैभव पाटील, संघटक अजित ठाकूर तर व्यवस्थापना तर्फे डायरेक्टर अनमोल मोदी, एच.आर. मॅनेजर वसंत ढोंगरे, ऑपरेशन मॅनेजर ब्रिजेश सिंग तर कामगार प्रतिनिधी अमोल ठाकूर, कल्पेश ठाकूर, संगप्पा घाडगे, रविंद्र पाटील आदी उपस्थित होते.

Digi Kokan
Author: Digi Kokan

Leave a Comment

READ MORE

READ MORE