मुंबई -गोवा महामार्गावर ‘स्पीड गन’ मोहिमेमुळे वेग मर्यादा ओलांडणाऱ्या वाहनांना चाप!

 

लांजा : मुबंई गोवा राष्ट्रीय महामार्गावर खानू मठ येथे वेग मर्यादा ओलांडण्याऱ्या वाहनांना परिवहन विभागाच्या ‘स्पीड गन” मोहिमेमुळे चांगलाच चाप बसला आहे तर दुसरीकडे हातखंबा ते वाकेड दरम्यान महामार्गाची दुरावस्था असताना स्पीड गन ने वाहनचालकांना नाहक भुर्दंड भरावा लागत असल्याने वाहनचालकांत नाराजी आहे.


75 किलोमीटर पेक्षा अधिक वेगमर्यादा ओलांडून जाणाऱ्या वाहन मालक यांना रुपये 2 हजार दंड आरटीओ कडून वसूल केले जात आहे.खानु मठ दरम्यान येथे स्पीड गन कॅमेरा लावला आहे.


दरवर्षी वाहनांच्या अतिवेगाने अपघात आणि पर्यायाने जीवितहानी वाढल्याचे आकडेवारीतून दिसून येते. जागतिक आरोग्य संघटनेच्या अहवालानुसार महामार्गावर होत असलेले अपघात आणि त्यातून होणारी जीवित हानी यासाठी परिवहन पोलीस विभागा मार्फत वेग मर्यादा ओलांडण्यावर दंडात्मक कारवाई केली जात आहे हल्लीची वाहने रस्त्यावर कशीही दामटवली जातात. आपत्कालीन स्थिती वगळता अतिवेगात आणि ठरावीक वेग मर्यादेने इच्छितस्थळी पोहोचण्यातील फरक हा काही मिनिटांचा असतो; परंतु याच अवघ्या काही मिनिटांसाठी अनेकांना प्राण गमवावे लागतात.

या पार्श्वभूमीवर वेगाला आवर घालण्यासाठी महामार्गांवर ठिकठिकाणी ”स्पीड टेस्ट गन” वाहतूक पोलिसांतर्फे लावण्यात आल्या आहेत. मुंबई-गोवा महामार्गावर एका उतारावर खानु या ठिकाणी स्पीड गन लावण्यात आली आहे. ताशी 75 ची वेग मर्यादा खानु ते मठ आहे. या ठिकणी अधिक वेगात वाहन चालऊन किंवा वाहन चालवताना अनेक जण आपल्याला सुसाट वेगात ओव्हरटेक करून जातात इंधनाचा अपव्यय आणि जीव धोक्यात घालून प्रवास होतो. शिवाय वेगमर्यादेचे उल्लंघन केले म्हणून दंडात्मक कारवाईलाही सामोरे जावे लागते. म्हणूनच महामार्गांवर ठिकठिकाणी वेगमर्यादाचे पालन करण्याचे आवाहन करणारे फलक नजरेस पडतात. तरीही त्याकडे दुर्लक्ष होत असल्याने जागतिक आरोग्य संघटनेच्या (डब्ल्यूएचओ) सूचनेनुसार वाहतूक पोलिसांनी महामार्गांवर वेग मर्यादेसाठी ‘स्पीड गन’ लावल्या आहेत. या गन वाहनाची दिशा, वेग, कोणत्या लेनने वाहन मार्गस्थ झाले, कॅमेरा कुठे लावला आहे, तारीख, वेळ आदी सर्व माहिती देतात. प्रत्येक वाहन आणि मार्गावर पोलिसांकडून एक वेगमर्यादा निश्चित केलेली असते.

महामार्गांवर अवजड वाहनांसाठी ताशी ४० ते ६०, कार किंवा तत्सम वाहनांसाठी ताशी ६० ते ८० किंवा त्याहून कमी अधिक वेग मर्यादा निश्चित केलेली असते. रस्ते, ठिकाण आदींनुसार यात वाहतूक विभागाकडून बदल केले जातात. बहुतांश स्पीड कॅमेरे जिथे अपघात अधिक होतात किंवा वाहनांचा वेग अधिक असतो अशा उतारांवरच लावलेले असतात.स्पीड गनचे फायदे काय?रस्त्यावरील अपघात कमी करण्यासाठी स्पीड गन महत्त्वाची भूमिका बजावतात. वाहनाने वेग मर्यादा ओलांडल्यास किंवा सिग्नल मोडल्यास ही गन/कॅमेरे सहज ओळखतात. या कॅमेरात वाहनाचा वेग शोधण्यासाठी रडारचा वापर केलेला असतो.स्पीड कॅमेरे वेग, तसेच प्रदूषणाचा धोका कमी करतात. एखादी दुर्घटना घडल्यावर अपघातग्रस्तांच्या वकिलाला पुराव्याची आवश्यकता असते. अशावेळी स्पीड कॅमेऱ्यांचे स्पष्ट फुटेजच चांगला पुरावा देऊ शकतात.स्पीड कॅमेऱ्यांमुळे अपघातांची संख्या काही अंशी घटत आहे. शिवाय दंडाच्या धसक्याने तरी बहुतांश वाहनचालक वेग मर्यादेचे पालन करताना दिसतात. अतिवेगात वाहन दामटवण्याचे प्रकार टाळले जातात.वेग नियंत्रित ठेवल्यामुळे, वाहतूक सुरळीत राहते, प्रदूषण घटून वातावरण चांगले राहते, प्रवासात अपघाताची चिंता राहत नाही. हवामानाचा या स्पीड कॅमेरांवर कोणताही परिणाम होत नाही. उणे ५ ते अगदी ५५ अंश सेल्सिअस वातावरणातही हे कॅमेरे कार्यरत राहतात.स्वयंचलित दंडस्पीड कॅमेऱ्यात कोणत्याही प्रकारच्या त्रुटीची शक्यता कमी असते; तरीही काही त्रुटी आढळल्यास कॅमेऱ्यांद्वारे स्वयंचलित होणारा दंड वाहतूक नियंत्रकाद्वारे नियंत्रण कक्षामध्ये प्रमाणित केला जातो. त्यानंतर हा डेटा राष्ट्रीय माहिती विज्ञान केंद्राकडे (एनआयसी) संकलित करण्यासाठी पाठविला जातो. यातही एखाद्या व्यक्तीने चुक केलीच नसल्याचा दावा केल्यास जवळच्या वाहतूक केंद्राला भेट देऊन ‘चलान’ तपासता येऊ शकते.दंड किती?एखादी व्यक्ती अतिवेगाने, बेशिस्तपणे वाहन चालवत असेल आणि पोलिसांच्या निर्देशांचे उल्लंघन करत असेल तर त्याला दुप्पट, तीनपट दंडही आकारला जाऊ शकतो.

स्पीड कॅमेऱ्याद्वारे प्रत्येक वाहनाचे स्थान आणि वेग सहज ओळखता येतो आणि तुमचे वाहन चोरीला गेल्यास हे खूप उपयुक्त ठरते.स्पीड गन चे स्वागत होत असताना लांजा ते रत्नागिरी महामार्गावर प्रवास हा मोठा जिकिरीचा आणि कंटाळवाणा झाला आहे. कार, रिक्षा दुचाकी यांना याचा त्रास होत आहे. मोठं मोठे खड्डे यामुळे वाहन चालवताना कसरत करावी लागत आहे. गाड्या खराब होणे नादुरुस्त चे प्रमाण या महामार्गवार वाढले आहे. किमान रस्ता सुस्थितीत झाल्यावर या ठिकाणी स्पीड मर्यादा कॅमेरे लावावेत अशी मागणी होत आहे. दरम्यान या दंड वसूल कारवाईला स्थगिती देण्याची मागणी खासदार विनायक राऊत यांच्या कडे वाहन चालक यांच्या वतीने शिवसेना लांजा तालुका प्रमुख संदिप दळवी यांनी केली आहे. महामार्ग चे काम अधिक वेगाने होऊ द्या त्यानंतर वाहन चालक वेग मर्यादा दंड भरतील अशी मागणी आहे

Digi Kokan
Author: Digi Kokan

Leave a Comment

READ MORE

READ MORE