रत्नागिरी (सुरेश सप्रे) : रत्नागिरी जिल्हातील व्यासंगी शिक्षक, पत्रकार ,कवी, लेखक आणि मराठी विषयाचे मार्गदर्शक, पेपर सेटर असलेल्या प्रा. शंकर जाधव यांना मराठी विषयातील डॉक्टरेट (पीएच.डी) जाहीर झाली आहे . “1960 नंतरच्या कोकणातील लेखिकांच्या साहित्याचा अभ्यास ” हा त्यांच्या संशोधनाचा विषय होता.
बेळगाव येथील राणी चन्नम्मा विश्वविद्यालय येथील मराठी विभागाचे प्रा.डॉ. चंद्रकांत वाघमारे यांचे त्यांना मार्गदर्शन लाभले. संशोधनपूर्व अभ्यासक्रमातही त्यांनी उच्च गुणवत्ता प्राप्त केली आहे. यापूर्वी त्यांना मराठी विषयातील ‘गोल्डमेडल’ ही मिळाले आहे. कोकणातील लेखिका आणि त्यांचे साहित्य काहीसे दुर्लक्षित होते. त्यामुळे या दुर्लक्षित लेखिकांच्या सहित्याची दखल घेत त्यानी हा विषय निवडला.
दै. ‘रत्नागिरी टाइम्स’मधे उपसंपादक म्हणून अनेक वर्षे काम केलेल्या प्रा. जाधव यांनी वेगळ्या विषयात पीएच. डी.प्राप्त केल्याने त्यांचे सर्वत्र अभिनंदन होत आहे.

