शिबिरात पावणे दोनशे रुग्णांची नेत्र तपासणी
उरण (विठ्ठल ममताबादे ) : आरोग्याच्या सेवा तळागाळातील लोकांपर्यंत पोहोचाव्यात, आरोग्यविषयक जनजागृती व्हावी, ज्येष्ठ नागरिक, आबाल वृद्धांना त्यांच्या परिसरातच डॉक्टर मार्फत डोळ्यांची मोफत तपासणी करून मोतीबिंदूचे मोफत ऑपरेशन करण्याच्या अनुषंगाने शंकरा आय हॉस्पिटल नवीन पनवेल आणि श्री छत्रपती शिवाजी महाराज सामाजिक संस्था उरण, आम्ही पाणदिवेकर समूह, आई इंटरप्रायजेस पाणदिवे,न्हावा शेवा सीएचए संघटना यांच्या संयुक्त्त विद्यमाने रविवार दि 16/4/2023 रोजी सकाळी 10 ते दुपारी 2 या वेळेत श्री दत्त मंदिर, परशुराम पाटील इंग्लिश मिडियम स्कूल समोर पाणदिवे येथे मोफत नेत्र तपासणी व मोफत मोतीबिंदू शस्त्रक्रिया शिबीराचे आयोजन, माफक दरात चष्मे वाटपचे आयोजन करण्यात आले होते.



या शिबिराचे उदघाटन आई इंटरप्रायजेसचे मालक किरण पाटील, अतुल पाटील यांनी केले.आम्ही पाणदिवेकर समूहाचे प्रमुख तथा सामाजिक कार्यकर्ते अमित पाटील, आई इंटरप्रायजेसचे मालक किरण पाटील, अतुल पाटील,न्हावा शेवा सीएचए संघटनेचे अध्यक्ष रुपेश भगत, श्री छत्रपती शिवाजी महाराज सामाजिक संस्थेचे अध्यक्ष सुदेश पाटील यांच्या हस्ते श्रीफळ वाढवून कार्यक्रमाला सुरवात झाली.
या मोफत नेत्र तपासणी, मोफत मोतीबिंदू शस्त्रक्रिया शिबीर व माफक दरात चष्मे वाटप शिबिराला जनतेचा उत्तम प्रतिसाद लाभला.175 रुग्णांची नेत्र तपासणी करण्यात आली तर 23 रुग्णांना मोफत मोतीबिंदू ऑपरेशनसाठी पुढे हॉस्पिटलला पाठविण्यात आले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन मिलिंद म्हात्रे यांनी तर आभार प्रदर्शन विठ्ठल ममताबादे यांनी केले.कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी सर्वच सहभागी सामाजिक संस्थांनी, संस्थेच्या सर्व पदाधिकारी सदस्यांनी विशेष मेहनत घेतली.
