महाराष्ट्र कॉलेज मुंबई येथील कर्मचारी आणि विद्यार्थ्यांनी केले आर्थिक सहाय्य

खेड : खालिद भाईंच्या आणि जल फाउंडेशन कोकण विभाग रजिस्टर या संस्थेच्या माध्यमातून खेड तालुक्यात अनेक गावांमध्ये पाण्याचे काम सुरू असताना खेड पन्हाळजे विभागात असलेला तुंबाड गाव आणि या गावातील भोईवाडी येथील ग्रामस्थांनी त्यांना भेडसावणारी पाण्याची समस्या जलदुत खालिद भाईंच्या कानावर घातली त्यानंतर काही दिवसांनी खालिद भाईंनी हा विषय मुंबई येथील महाराष्ट्र कॉलेजचे प्राध्यापक डॉ. सिराज चौगुले यांच्याकडे दिला
प्राध्यापक डॉ सिराज चौगुले सर आणि कॉलेज चे सर्व कर्मचारी विद्यार्थी वर्ग यांनी या उपक्रमासाठी निधी गोळा करण्याचे आव्हान केले त्यानंतर काही वेळातच हा निधी जमा झाला. या कॉलेज मुंबई 2023 मध्ये एकूण 6 ठिकाणी पाण्याचे काम होईल इतका मोठा निधी गोळा झालेला आहे आणि त्यातील 4 ठिकाणी आतापर्यंत काम केले आहे.

महारष्ट्र कॉलेज मुंबईचे प्राध्यापक डॉ. सिराज चौगुले तसेच कर्मचारी विद्यार्थी वर्ग आणि जलदुत खालिद भाई तसेच ग्राउंड लेवल वर काम करणारे नाडकर बंधू आणि समस्त जल फाउंडेशन कोकण विभाग रजिस्टर या संस्थेचे पदाधिकारी कार्यकर्ते पत्रकार बंधू यांच्या माध्यमातून हा प्रकल्प मार्गी लागला आहे, अशी माहिती जल फाउंडेशन कोकण विभाग नोंदणीकृत या संस्थेचे संस्थापक अध्यक्ष श्री. नितिन सखाराम जाधव यांनी दिली.
