जुन्या काळातील संघाचे नि:स्वार्थी स्वयंसेवक वैद्य डॉ. अप्पा बापट यांचे निधन

देवरूख (सुरेश सप्रे) : जुन्या काळातील वैद्य व राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे निष्ठेने काम करत तालुक्यात जनसंघ व भाजपाला तळागाळात पोहविणारे डॉ. शांताराम उर्फ अप्पा बापट याचे वृद्धापकाळाने माभळे येथे दुःखद निधन झाले.

देवरूखात खालची आळीतील अण्णा पावसकरांकडच्या घरात वेगवेगळ्या विषयांवर अत्यंत संयमी, प्रसंगी सडेतोड विचार मांडणारे,अप्पा 1977 च्या निवडणुकीपासून नंतर ज्या-ज्या निवडणुका झाल्या त्यावेळेला डॉ. अप्पा बापट यांचे घर म्हणजेच संघाचे कार्यालयच होते. तेथे डॉ. बापट. अँड. मुळ्ये. श्रीकृष्ण भिडेवगैरे जेष्ठ मंडळी स्वयंसेवकांना व कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करत प्रचार यंत्रणा चालवत असायचे डॉक्टरांचे घर म्हणजे कार्यकर्त्यांचे एक हक्काचे स्थान होते जेथे सर्व मित्रमंडळी जमून संघाचे व पक्षाचे काम करत होती.

एक निस्वार्थी संघाच्या संस्काराप्रमाणे स्वार्थ निरपेक्ष जीवन जगणारा एक स्वयंसेवक अनंतात विलीन झाल्याने सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे..

Digi Kokan
Author: Digi Kokan

Leave a Comment

READ MORE