उरण दि २ (विठ्ठल ममताबादे ) : रायगड जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष महेंद्रशेठ घरत यांनी नवनियुक्त उरण तहसीलदार उद्धव कदम, पंचायत समितीचे बीडीओ समीर वथारकर, न्हावा – शेवा पोलीस स्टेशनचे नवनियुक्त वरिष्ठ पोलीस निरीक्षक संजीव धुमाळ यांची उरण तालुका काँग्रेस कमिटीचे पदाधिकारी सदस्य यांच्या सोबत सदिच्छा भेट घेऊन पुष्पगुच्छ, शाल व जय शिवराय शिव चरित्र पुस्तक देऊन स्वागत केले.
या प्रसंगी तालुका अध्यक्ष विनोद म्हात्रे, रायगड इंटक अध्यक्ष किरीट पाटील, शहर अध्यक्ष प्रकाश पाटील, सेवादल अध्यक्ष कमलाकर घरत, जयवंत पाटील, भालचंद्र घरत, गुफरान तुगेंकर, प्रशांत पाटील उपस्थित होते.



