देवरूख (सुरेश सप्रे) : सीबीएसई बोर्डाचा १० वीचा निकाल जाहीर झाला. त्यात साडवली सारख्या ग्रामीण भागातील पी.एस. बने इंटरनॅशनल स्कूलमधील १० वीच्या पहिल्याच बँचचा निकाल १०० टक्के लागला आहे. यात भरत प्रसन्न सार्दळ याने ९७.२० टक्के गुण मिळवत पहीला क्रमांक प्राप्त करत घवघवीत यश संपादन केले आहे. तर सोहम निमिष ढोल्ये याने ९५.३५ टक्के गुण मिळवून द्वितीय क्रमांक पटकावला तर आराध्या गुरव हिने ९० टक्के गुण मिळवत तृतीय क्रमांक पटकाविला. या शाळेतील सर्व विद्यार्थ्यांनी फर्स्टक्लास मिळवत यश मिळविले.
महाराष्ट्र शिक्षण संस्थाने ७ वर्षापुर्वी साडवली येथे CBSE बोर्डाच्या मान्यतेने पी. एस. बने. इंटरनॅशनल स्कुलची स्थापना करून गग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना इंग्रजी माध्यमाच्या शाळेची सोय उपलब्ध करून दिली.. यंदा स्कूलची १०वी ची पहिल्या बँच होती.. विद्यार्थी वर्गाने १००% यश संपादन करून शाळेच्या लौकिकात भर घातली आहे. या यशात संस्थेत असलेल्या सुविधा व शिक्षकांनी घेतली मेहनत यामुळेच हे यश मिळाल्याचे संस्थेचे प्रमुख रोहन बने यांनी सांगितले.

सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे व शिक्षकांचे संस्थेचे अध्यक्ष बाळकृष्ण बने व सचिव माजी आमदार सुभाष बने. संचालक पराग बने. सौ. नेहा बने. मुख्याध्यापक आदिंनी अभिनंदन केले
