भाजपच्या ‘महाविजय २०२४’च्या संयोजन समिती सदस्यपदी समीर गुरव

गुरव हे रत्नागिरीतील रिळ गावचे सुपुत्र

मुंबई : भाजपने प्रवक्ता, प्रदेश कार्यकारिणी सदस्य अशा महत्वाच्या जबाबदाऱ्यां सोबत “महाविजय २०२४ संयोजन समिती सदस्य” म्हणून गुरुवारी समीर गुरव यांची पक्षाचे प्रदेशाध्यक्ष  चंद्रशेखर बावनकुळे यांनी नियुक्ती केली.

कुठलीही राजकीय पार्श्वभूमी नसलेल्या माझ्यासारख्या सामान्य कार्यकर्त्यांवर हा विश्वास दाखवल्याबद्दल उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळेजी आणि संयोजन समिती अध्यक्ष आ. श्रीकांत भारतीय यांचे आपल्यावर सोपवलेली जबाबदारी आणि दाखवलेला विश्वास आपण सार्थ ठरवू, असा विश्वास या नियुक्तीनंतर समीर गुरव यांनी व्यक्त केला.
या नियुक्ती बद्दल समीर गुरव यांचे अभिनंदन करण्यात आले. श्री. गुरव हे रत्नागिरीचे सुपुत्र आहेत. रत्नागिरी तालुक्यातील रिळ हे त्यांचे मूळ गाव. प्रदेश स्तरावरून त्यांची निवड होताच रत्नागिरी जिल्ह्यातून त्यांचे अनेकांनी अभिनंदन केले.

Digi Kokan
Author: Digi Kokan

Leave a Comment

READ MORE

READ MORE