रत्नागिरी : रत्नागिरी येथून सीएनजी चे कंटेनर खाली करून डिंगणी फुणगुस गावाकडे जाकादेवी मार्गे जाणारा टेम्पो चालकाचे नियंत्रण सुटल्यामुळे उलटला.
रत्नागिरी येथील सीएनजी स्टेशनवर सीएनजीचे कंटेनर खाली करून जाकादेवी मार्गे पुन्हा संगमेश्वरकडे जाणाऱ्या आयशर टेम्पोला सोमवारी सकाळी 7 वाजण्याच्या सुमारास जाकादेवी फुणगुस मार्गावर अपघात झाला. चालकाला गाडीवर नियंत्रण न मिळवता आल्याने टेम्पो अवघड वळणावर उलटला. या अपघातात चालकाच्या डोक्याला दुखापत झाली. त्याला उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. मात्र या अपघातात गाडीचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले.














