रत्नागिरी दि. १२ : शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था (मुलींची) रत्नागिरी येथे केंद्र शासन पुरस्कृत पब्लिक प्रायव्हेट पार्टनरशिप अंतर्गत संस्था व्यवस्थापन समिती (IMC) च्या कामकाजाकरिता तात्पुरत्या स्वरूपात खालील अटी व शर्तीच्या अनुसरुन मानधन तत्वावर लिपिक टंकलेखक (Data Entry Operator) नेमण्याचे आहे. तरी इच्छुक उमेदवारांनी खालील प्रमाणे असणाऱ्या शैक्षणिक व अनुभवाच्या नुसार संस्थेच्या पत्त्यावर शासकीय सुट्टी वगळून कार्यालयीन कामकाज वेळेत दि. 23 जुन, सायंकाळी 5 पर्यंत हस्तदेय अर्ज सादर करण्याचे आहे. पोस्टाने अथवा ई मेल द्वारे केलेले अर्ज ग्राह्य धरले जाणार नाही.
लिपिक टंकलेखक पदासाठी किमान वाणिज्य शाखेतील पदवी, संगणक ज्ञान, टॅली, टंकलेखन- मराठी व इंग्रजी, इंटनेट हाताळण्याचे ज्ञान असणे गरजेच. किमान 2 वर्षाचा वरील शैक्षणिक अर्हतेनुसार अनुभव आवश्यक आहे. दर महा 12000/- रू व 5% वार्षिक दरवाढ प्रमाणे मानधन देण्यात येईल. या पदावर लागणाऱ्या अटी व शर्ती पुढीलप्रमाणे :-
कार्यालयीन कामकाजाकरिता प्रवास करावा लागेल. 11 महिने नियुक्ती कालावधी व कामकाज समाधानकारक असल्यास पुढील 2 वर्षा करिता प्रत्येकी 11 महिन्याची नियुक्ती. कोणत्याही प्रवर्गातील उमेदवारास समान संधी. दरवर्षी 11 महिन्याचे बंदपत्र देणे अनिवार्य. कायमस्वरूपी सेवेत सामावून घेण्याविषयी तरतूद नाही. अनुभव प्रमाणपत्र अथवा सेवेत कार्यरत असलेला कोणताही दाखला अथवा प्रमाणपत्र देण्यात येणार नाही. उपरोक्त योजना केंद्रशासित पुरस्कृत असल्याने योजना चालू असे पर्यतच सेवेत कार्यरत ठेवण्यात येईल, याची इच्छुकांनी नोंद घ्यावी असे आवाहन प्राचार्यांनी केले आहे.
