रत्नागिरी : जिल्हा अजिंक्यपद तायक्वांदो स्पर्धा रत्नागिरी शहरात छत्रपती शिवाजी महाराज स्टेडियम जिल्हा क्रीडा संकुल बॅडमिंटन हॉल येथे दि. 17 ते 19 रोजी पार पडल्या. या स्पर्धेत साळवी स्टॉप नाचणे ओम साई मित्र मंडळ सभागृह युवा मार्शल तायक्वांदो ट्रेनिंग सेंटर साळवी स्टॉप प्रशिक्षण केंद्रामधील खेळाडूंनी सहभाग घेतला होता या स्पर्धेत पुमसेचे व क्योरोगी प्रकारात 37 सुवर्णपदक 20 रौप्य पदक 30 कास्यपदक असे एकूण 87 पदक संपादन मिळवून जनरल चापियनशिप पटकावले तसेच पूमसे प्रकारात प्रथम क्रमांक पटकावून घवघवीत यश संपादन केले.
जिल्हा अजिंक्यपद स्पर्धेत यश संपादन केल्याने युवा मार्शल तायक्वांदो ट्रेनिंग सेंटरचे अध्यक्ष कोमल सिंह व सर्व पदाधिकारी तसेच अन्नपूर्णा संगीत विद्यालय ओम साई मित्र मंडळाचे अध्यक्ष अनंत आगाशे यांनी शुभेच्छा दिल्या तसेच सुवर्णपदक विजेते खेळाडू मुंबईत होणाऱ्या राज्यस्तरीय कॅडेट स्पर्धेसाठी निवड झाल्याने महाराष्ट्र तायक्वांदो असोसिएशनचे कोषाध्यक्ष व रत्नागिरी टायकोंडो स्पोर्ट्स असोसिएशनचे अध्यक्ष वेंकटेश्वर राव कररा, उपाध्यक्ष विश्वदास लोखंडे, कोषाध्यक्ष शशांक घडशी, सचिव लक्ष्मण कररा, सदस्य संजय सुर्वे यांनी शुभेच्छा देऊन अभिनंदन केले
स्पर्धेतील विजेते खेळाडू पुढील प्रमाणे :
सुवर्णपदक विजेते खेळाडू
मयुरी कदम, अस्मी साळुंखे, संस्कृती सपकाळ,
उपर्जना कररा, श्रियांश कांबळे आराध्य तहसीलदार अर्जुन पवार, मंथन आंबेकर, सार्थक गमरे, भार्गवी पवार,
योगराज पवार, सई सुवरे, नुपूर दप्तरदार,
अमेय पाटील, वेदांत देसाई, अमीन बुडये, परिक्षित कांबळे,
लतिका जैनापुरे.
रौप्य पदक विजेते खेळाडू
ओवी काळे, अरहा आयरे, तुषार पाटील, श्रुती काळे हर्षदा मोहिते, प्रतीक पवार, संबोधी जाधव.
कांस्य पदक विजेते खेळाडू
साधना गमरे, रिद्धी धुळप, रुद्रा सुर्वे, सुधांशू कांबळे, प्रीत पोतदार, ओम करे.
या सर्व पदक विजेते खेळाडूंना मुख्य प्रशिक्षक राम कररा, सह प्रशिक्षक तेजकुमार लोखंडे, अमित जाधव, महिला प्रशिक्षिका सौ. शशिरेखा कररा यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले.
