रत्नागिरी जिल्ह्याला पुढील ३ दिवस ‘ऑरेंज अलर्ट’

रत्नागिरी दि. ५ : भारतीय हवामान विभागाकडून पर्जन्यविषयक प्राप्त झालेल्या संदेशानुसार दि. 7, 8 व 9 जुलै राजी रत्नागिरी जिल्हयाला ऑरेंज अर्लटचा इशारा देण्यात आलेला आहे. या दिवशी जिल्हयातील काही ठिकाणी मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस पडण्याची शक्यता वर्तविण्यात आलेली आहे.

तसेच उद्या दि. 6 जुलै रोजी रत्नागिरी जिल्हयासाठी रेड अलर्ट वर्तविण्यात आला आहे. या दिवशी जिल्हयातील काही ठिकाणी मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस होण्याची शक्यता आहे. या अलर्टच्या अनुषंगाने संबधित यंत्रणांनी सावधानतेच्या व सुरक्षितेच्या दृष्टीने कार्यरत रहावे तसेच नागरिकांनी काळजी घ्यावी असे आवाहन जिल्हा प्रशासनाकडून करण्यात आले आहे.

Digi Kokan
Author: Digi Kokan

Leave a Comment

READ MORE

best news portal development company in india

READ MORE