रत्नागिरी दि.६ (जिमाका):- शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था, संगमेश्वर येथे वीजतंत्री, जोडारी, यांत्रिक डिझेल, ड्रेसमेकिंग, नळकारागिर या पाच व्यवसायासाठी प्रवेश अर्ज भरण्याची सुरुवात झाली असून अर्ज भरण्याची अंतिम मुदत ११ जुलैपर्यंत आहे.
अधिक माहितीसाठी संस्थेत संपर्क साधण्याचा आवाहन करण्यात आले आहे. त्याचबरोबर https://admission.dvet.gov.in या संकेतस्थळावर माहिती उपलब्ध आहे. तसेच लाभार्थ्यांनी प्रवेश अर्ज भरणे, अर्ज निश्चितीकरण करणे, व्यवसाय भरणे या बाबी वेळेत पूर्ण करणे आवश्यक आहे, मुदतीनंतर आलेल्या अर्जाचा विचार केला जाणार नसल्याचे प्राचार्य शासकीय औ. प्र. संस्था संगमेश्वर यांनी कळविले आहे.














