कोकण रेल्वे मार्गावर ११, १२ जुलैला ‘मेगा ब्लॉक’ ; सहा गाड्यांच्या वेळात्रकावर होणार परिणाम

रत्नागिरी : कोकण रेल्वे मार्गावर देखभालीच्या कामासाठी दि. 11 व 12 जुलै  2023 रोजी मेगा ब्लॉक घेण्यात येणार आहे. संगमेश्वर ते भोके दरम्यान दि. 11 जुलैला तर कुडाळ ते वेर्णा दरम्यानच्या देखभालीच्या कामासाठी 12 जुलै रोजी मेगा ब्लॉक घेण्यात येणार असल्याचे कोकण रेल्वेकडून कळवण्यात आले आहे.

दि. 11 जुलैच्या संगमेश्वर ते भोके दरम्यानच्या सकाळी    7.30 ते 10.30 अशा 3 तासांच्या मेगा ब्लॉकमुळे तिरुनेलवेली-जामनगर (11577)  ही दि. 10 जुलै रोजी प्रवास सुरु होणारी  एक्स्प्रेस गाडी ठोकुर ते रत्नागिरी दरम्यान 2 तास 30 मिनिटे थांबवून ठेवली तर   10 जुलै रोजी प्रवास होणारी तिरुअनंतरपुरम सेंट्रल- लो. टिळक टर्मिनस नेत्रावती एकस्प्रेस  (16346) कर्नाटकातील ठोकुर ते रत्नागिरी दरम्यान 1 तास थांबवून ठेवली जाणार आहे.

याचबराबरोबर दि. 12 रोजी कुडाळ ते  वेर्णा दरम्यानच्या कामासाठी घेण्यात येणार्‍या  सायंकाळी 3 ते 6 वाजेपर्यंत अशा तीन तासांच्या ब्लॉकमुळे कोकण रेल्वे मार्गे धावणार्‍या चार गाड्यांच्या वेळापत्रकावर परिणाम होणार आहे.

या मेगा ब्लॉकमुळे मुंबई सीएसएमटी -मडगाव (12051)  ही 12 जुलै रोजी प्रवास सुरु होणारी जनशताब्दी एक्स्प्रेस गोव्यातील थीवी स्थानकावर तीन तास,  हजरत निजामुद्दीन -एर्नाकुलम (12618)  ही दि. 11 जुलैला प्रवास सुरु होणारी मंगला  एक्स्प्रेस रोहा ते कुडाळ दरम्यान अडीच तास रोखून ठेवली जाणार आहे.

याचबरोबर दिवा सावंतवाडी एक्स्प्रेस (10105) ही  12 रोजीची गाडी रोहा ते कणकवली दरम्यान 50 मिनिटे तर तिरुअनंतरपुरम सेट्रल- हजरत निजामुद्दीन (22653) ही गाडी ठोकुर ते वेर्णा दरम्यान 2 तास 50 मिनिटेे रोखून ठेवली जाणार आहे.

Digi Kokan
Author: Digi Kokan

Leave a Comment

READ MORE

READ MORE