Vande Bharat Express | कोकण रेल्वे मार्गावरील वंदे भारतसह मध्य रेल्वेच्या चारही वंदे भारत एक्सप्रेस फायद्यात!

मुंबई : काही दिवसापूर्वीच कोकण रेल्वे मार्गावर सुरू झालेल्या वंदे भारत एक्सप्रेससह मध्य रेल्वेकडून चालवल्या जाणाऱ्या चारही वंदे भारत एक्सप्रेस रेल्वेच्या तिजोरीत भर घालणाऱ्या ठरल्या आहेत. या चारही गाड्यांचे उत्पन्न प्रमाण पाहता या चारही गाड्या रेल्वेसाठी फायद्याच्या ठरत आहेत.

सेंट्रल रेल्वेकडून मुंबई- अहमदाबाद, मुंबई -शिर्डी, मुंबई- सोलापूर तसेच अगदी अलीकडेच म्हणजे दिनांक 27 जून 2023 रोजी शुभारंभ झालेली मुंबई छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस ते मडगाव दरम्यान कोकण रेल्वेमार्गे धावणारी वंदे भारत एक्सप्रेस अशा एकूण चार वंदे भारत एक्सप्रेस गाड्या चालवल्या जात आहेत. मध्य रेल्वेकडून चालवल्या जाणाऱ्या या चारही गाड्यांचे प्रवासी भारमान 50 टक्क्यांपेक्षा अधिक आहे. वातानुकूलित श्रेणीतील फायद्या तोट्याचे गणित मांडताना या चारही गाड्या रेल्वेच्या दृष्टीने फुल्ल चालत आहेत. मध्य रेल्वेसाठी ही बाब दिलासादायक ठरली आहे.

मडगाव मुंबई मार्गावरील वंदे भारत एक्सप्रेसच्या शुभारंभाचा आनंददायी क्षण.

हे देखील वाचा  : Konkan Railway | गणेशोत्सवात चिपळूणसाठी स्वतंत्र मेमू स्पेशल गाडी धावणार!

Digi Kokan
Author: Digi Kokan

Leave a Comment

READ MORE

READ MORE