Vande Bharat Express | भारताची लोकप्रिय वंदे भारत एक्सप्रेस आता भगव्या रंगातही!

रत्नागिरी : नीळ्या- पांढऱ्या रंगसंगती बरोबरच आता यापुढे नीळ्या रंगाच्या ठिकाणी भगव्या रंगातील वंदे भारत एक्सप्रेस देखील देशातील रेल्वे मार्गावर धावताना दिसणार आहे. चेन्नई मधील इंटिग्रेटेड कोच फॅक्टरीत ( आयसीएफ ) भगव्या रंगातील वंदे भारत एक्सप्रेस गाड्या आकार घेत आहेत.


केंद्रीय रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी शनिवारी चेन्नई मधील आयसीएफ या रेल्वे गाड्या बनवणाऱ्या कारखान्याला भेट दिली आणि तिथे सुरू असलेल्या निर्माण कार्याचा आढावा घेतला. शनिवारी हा आढावा घेतल्यानंतर देशवासीयांसमोर निळ्या व भगव्या रंगातील वंदे भारत एक्सप्रेस प्रथमच आली. आता निळ्या रंगाच्या ठिकाणी भगव्या रंगाची शेड असलेल्या वंदे भारत गाड्यांची निर्मिती सुरू असल्याचे पुढे आले आहे. पांढऱ्या रंगासह भगव्या रंगातील शेडयुक्त वंदे भारत एक्सप्रेस गाड्या भारतीयांच्या पसंती उतरतील, असा विश्वास, केंद्रीय रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी व्यक्त केला आहे.

कोकण रेल्वे मार्गावरील वंदे भारत एक्सप्रेसचा शुभारंभाचा आनंददायी क्षण
Digi Kokan
Author: Digi Kokan

Leave a Comment

READ MORE

READ MORE