दापोलीत उद्या समर सायक्लोथॉन स्पर्धा

दापोली : सायकल चालवण्याचे अनेक फायदे आहेत. सायकल संस्कृती वाढावी व सायकलबद्दल आवड निर्माण व्हावी या हेतूने दापोली सायकलिंग क्लबतर्फे रविवार २२ मे २०२२ रोजी दापोली समर सायक्लोथॉन २०२२ चे आयोजन केले आहे. ही सायकल स्पर्धा आझाद मैदान दापोली येथून सकाळी ६:३० वाजता मान्यवरांच्या उपस्थितीत सुरु होणार आहे.

ही स्पर्धा फॅन राईड आणि चॅलेंज राईड अशी २ गटात आहे. फन राईड विनामूल्य आहे. चॅलेंज राईड ५, १०, १५, २०, २५ किमीची असून यासाठी प्रवेश शुल्क २०० रुपये आणि विद्यार्थ्यांसाठी १०० रुपये आहे. सायकल राईड मार्ग आझाद मैदान – डॉ बाबासाहेब आंबेडकर चौक – एव्हरेस्टवीर सुरेंद्र चव्हाण चौक – पांगारवाडी जालगाव – लालबाग – उदयनगर – आझाद मैदान असा ५ किमीचा असून यावर फेऱ्या मारुन ५ ते २५ किमी अंतर पूर्ण करता येणार आहे. हे अंतर पूर्ण करणाऱ्या सर्व स्पर्धकांना आकर्षक मेडल आणि प्रमाणपत्र देऊन गौरवण्यात येणार आहे.

ऑनलाईन नोंदणी https://www.townscript.com/e/dapoli-summer-cyclothon-2022-314124 या लिंक वर करु शकता तर ऑफलाईन नोंदणी फॉर्म १. समर्थ कुशन एजन्सी, अर्बन कॉलेजजवळ, २. सुनिल ऑटोमोबाईल, बुरोंडी नाका ३. विनी इलेक्ट्रिकल, फॅमिली माळ, ४. श्री सायकल शॉप, केळसकर नाका ५. सम्यक किराणा शॉप लष्करवाडी, ६. मंदार कार ॲक्सेसरीज, सुतारवाडी गिम्हवणे ७. जोशी ब्रदर्स मेडिकल, बाजारपेठ या ठिकाणी भरता येतील. सुरवातीला नोंदणी केलेल्या पहिल्या २०० सायकलस्वारांना गुडी बॅग मिळणार आहे. अधिक माहितीसाठी अंबरीश गुरव ८६५५८७४४८६, पराग केळसकर ९४२२४३३२९१ यांना संपर्क करु शकता.

Digi Kokan
Author: Digi Kokan

Leave a Comment

READ MORE

Pelli Poola Jada

READ MORE