फिनोलेक्स कंपनी कंपनी, मुकुल माधव फाऊंडेशनतर्फे टंचाईग्रस्तांना टँकरने पाणी

रत्नागिरी : पाणीपुरवठा आणि जल संवर्धनाच्या क्षेत्रातील आपले योगदान अविरत चालू ठेवत फिनोलेक्स कंपनी कंपनी आणि सीएसआर पार्टनर मुकुल माधव फाउंडेशनच्या मदतीने फणसोप आणि भाट्ये या गावातील टंचाईग्रस्त वाड्यांना पाणीपुरवठा कामाचा प्रारंभ झाला.
फिनोलेक्स कंपनीच्या जवळच्या या 2 गावांना दरवर्षी उन्हाळ्यात पाण्याचा खुप तुटवडा भासतो तेव्हा कंपनीतर्फे पाणीपुरवठा केला जातो. गेली 6 वर्ष याअंतर्गत भाट्ये, फणसोप गावाच्या दुष्काळग्रस्त वाड्यांना टँकरने पाणीपुरवठा केला जात आहे. या ग्रामपंचायतीच्या सार्वजनिक पाणीपुरवठा विहिरींमधील पाणीसाठ्यात लक्षणीय घट झाली आहे. या दोन्ही ग्रामपंचायतींचा सुमारे 1500 लोकसंख्येचा भाग खाडीपट्ट्याचा असून येथील पाणी पिण्यायोग्य नाही. या स्थितीत दोन्ही ग्रामपंचायतीने पाणीपुरवठा करण्याची विनंती केली. त्यावर फिनोलेक्स व मुकुल माधव फाउंडेशनच्या विश्वस्त रितू प्रकाश छाब्रिया यांनी तत्परतेने निर्णय घेत सामाजिक बांधिलकीतून लगेचच टँकरची व्यवस्था करून दिली आहे.
या कार्यक्रमाच्या उद्घाटन प्रसंगी भाट्ये व फणसोप गावचे सरपंच, ग्रामपंचायत सदस्य, प्रशासकीय अधिकारी, ग्रामस्थ व कंपनी अधिकारी उपस्थित होते. व त्यांनी फिनोलेक्स कंपनी आणि मुकुल माधव फाउंडेशनच्या पाणी पुरवठा करण्याच्या या खूप मोलाच्या सहकार्याबद्दल आभार व्यक्त केले.

फिनोलेक्स कंपनी व मुकुल माधव फाऊंडेशनमार्फत फणसोप व भाट्ये ग्रामपंचायतीला टँकरने पाणीपुरवठा करण्यात आला त्या प्रसंगी.

Digi Kokan
Author: Digi Kokan

Leave a Comment

READ MORE

Pelli Poola Jada

READ MORE