एस. पी. हेगशेट्ये महाविद्यालयातर्फे स्किल डेव्हलपमेंट अँड करिअर ओरिएंटेड कोर्सवर मार्गदर्शन

रत्नागिरी : नवनिर्माण शिक्षण संस्थेच्या एस. पी. हेगशेट्ये महाविद्यालयातर्फे स्किल डेव्हलपमेंट अँड करिअर ओरिएंटेड कोर्स याविषयावर मार्गदर्शन नुकतेच करण्यात आले. या माहितीप्रधान सेमिनारमध्ये कोलते कॉम्पुटरर्सचे संस्थापक संतोष कोलते यांनी मार्गदर्शन केले.

यावेळी प्राचार्य डॉ. आशा जगदाळे, जुनिअर कॉलेज इन्चार्ज प्रा. सुकुमार शिंदे, प्रा. प्रकाश पालांडे, प्रा. अमृता साळवी, प्रा. प्रतीक्षा सुपल, प्रा. सिद्धीका हातिस्कर आदी उपस्थित होते.


प्रमुख वक्ते संतोष कोलते म्हणाले, आजच्या जागतिक स्पर्धेत नोकऱ्या मिळविण्यासाठी पारंपरिक अभ्यासक्रमासोबत संगणक हाताळणीचे विविध कोर्स करणे गरजेचे आहे. यासाठी महाराष्ट्र शासनाच्या विविध योजना आहेत. त्याचा लाभ विदयार्थ्यांनी घ्यायला हवा. यावेळी त्यांनी विविध संगणक कोर्सबद्दल माहिती दिली.
अध्यक्षीय मनोगत व्यक्त करताना प्रा. डॉ. आशा जगदाळे म्हणाल्या, प्रत्येकाला स्किलबेस शिक्षण गरजेचे आहे. नियमित अभ्यास करताना संगणकाचे कोर्स करुन रोजगाराच्या वाटा खुल्या करुन घेणे विद्यार्थ्यांच्या हातात आहे.


यावेळी प्रा. सुकुमार शिंदे यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. सोनिया मापुस्कर यांनी केले. आभार प्रा. निशिता पिलणकर आणि प्रा. प्रतीक्षा सुपल यांनी मानले.

Digi Kokan
Author: Digi Kokan

Leave a Comment

READ MORE

READ MORE