सवणे आदिवासीवाडी येथे जातीचे दाखले काढण्यासाठी कॅम्प

उरण दि. १७ (विठ्ठल ममताबादे ) : कातकरी उत्थान कार्यक्रमा अंतर्गत कोकण विभागीय आयुक्त डॉ महेंद्र कल्याणकर, जिल्हाधिकारी डॉ. योगेश म्हसे, उपविभागीय अधिकारी राहुल मुंडके, आदिवासी प्रकल्प अधिकारी शशिकला अहिरराव, तहसीलदार विजय पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली जय भवानी मित्र मंडळ, परिवर्तन सामाजिक संस्था आणि उरण सामाजिक संस्थेच्या संयुक्त विद्यमाने रविवारी 16 जुलै 2023 रोजी सवणें आदिवासीवाडी तालुका पनवेल येथे सकाळी 10 ते दुपारी 2 वाजेपर्यंत जातीचे दाखले काढण्यासाठी कॅम्पचे आयोजन करण्यात आले.

सर्व आदिवासी बांधवांना आधार कार्ड, रेशन कार्ड, शाळेचा दाखला, घरातील कोणत्याही व्यक्तीचा जातीचा दाखला, मतदानाचे कार्ड, सात बारा उतारा, जन्माचा दाखला, बँक खाते बुक इत्यादी कागद पत्रांच्या झेरॉक्स घेवून येण्यास सांगितले होते. त्याप्रमाणे एकूण 140 आदिवासी बांधवांनी जातीचे दाखले काढण्यासाठी फॉर्म्स भरले. ह्या कॅम्प साठी विशेष मेहनत भगवान देशमुख यांनी घेतली आणि कॅम्प चे संपूर्ण आयोजन केले. आदिवासी विकास निरीक्षक पांढरे यांनी सर्व फॉर्म्स तपासून त्यावर शिक्कामोर्तब केले. उरण सामाजिक संस्थेचे उपाध्यक्ष प्रा. राजेंद्र मढवी, दत्ता गोंधळी व नामदेव ठाकूर यांनी सर्व अर्ज भरण्यासाठी मदत केली.

परिवर्तन सामाजिक संस्थेचे अध्यक्ष रत्नाकर घरत यांनी सर्व कार्यक्रमाचे व्यवस्थित पणे नियोजन केले. वाडी वरील राघो वाघ आणि सुशिक्षित आदिवासी मुलांनी फॉर्म्स भरण्यासाठी मदत केली. प्रा राजेंद्र मढवी यांनी कोंकण विभागीय आयुक्त डॉ महेंद्र कल्याणकर, जिल्हाधिकारी डॉ. योगेश म्हसे, उपविभागीय अधिकारी राहुल मुंडके, प्रकल्प अधिकारी श्रीमती शशिकला अहिरराव, तहसीलदार विजय पाटील, आदिवासी विकास निरीक्षक पांढरे सर, मंडल अधिकारी मनोज मोरे, तलाठी श्री तवर, उरण सामाजिक संस्थेचे अध्यक्ष सुधाकर पाटील, सरचिटणीस संतोष पवार आणि इतर सर्व सदस्यांचे आभार मानले व अशा प्रकारचे कॅम्प सर्व कातकरी आणि ठाकूर वाड्यांवर होणे आवश्यक आहे असे मत नोंदविले.

Digi Kokan
Author: Digi Kokan

Leave a Comment

READ MORE

READ MORE