Konkan Railway | गणेशोत्सवातील दिवा-रत्नागिरी मेमू दादरवरून सोडण्याची मागणी

रत्नागिरी : पुढील महिन्यात होणाऱ्या गणेशोत्सवासाठी कोकण रेल्वेने रत्नागिरीपर्यंत मध्य रेल्वेच्या संयुक्त सहकार्याने जाहीर केलेली मेमू स्पेशल गाडी दिव्या ऐवजी दादरवरून सोडावी, अशी मागणी कोकणवासी प्रवासी जनतेच्या वतीने करण्यात येत आहे. यासाठी रेल्वेला पत्रही पाठवण्यात आले आहे.

कोकण रेल्वे मार्गावर गणेशोत्सवासाठी विशेष गाड्यांच्या १५६ फेऱ्या जाहीर

नियमित गाड्यांसह यापूर्वी जाहीर केलेल्या विशेष गाड्यांचे गणपती उत्सवातील आरक्षण फुल्ल झाल्यामुळे मध्य रेल्वेने यावर्षीच्या गणेशोत्सवासाठी गणपती स्पेशल गाड्यांच्या शेकडो फेऱ्या जाहीर केल्या आहेत. यानुसार 2023 मधील गणेशोत्सवासाठी मुंबईतून कोकण रेल्वे मार्गावर रत्नागिरीपर्यंत प्रथमच मेमू स्पेशल गाडी चालवण्यात येणार आहे. याआधी गणेशोत्सवात डेमू तसेच मेमू स्पेशल गाडीचा प्रयोग चिपळूणपर्यंतच करण्यात आला होता. त्यापुढे मेमू स्पेशल गाड्या चालवल्या जात नव्हत्या. मात्र येत्या सप्टेंबर 2023 मध्ये होणाऱ्या गणेशोत्सवात कोकण रेल्वे तसेच मध्य रेल्वेकडून दिवा ते रत्नागिरी मार्गावर प्रथमच मेमो स्पेशल गाड्या चालवण्यात येणार आहेत. दिनांक 13 सप्टेंबर 2023 ते 2 ऑक्टोबर 2023 या कालावधीत रत्नागिरी स्थानकापर्यंत प्रथमच मेमू स्पेशल गाडी धावणार आहे.

रेल्वेने यंदाच्या गणेशोत्सवासाठी दिवा येथून चिपळूण तसेच रत्नागिरीसाठी मेमू स्पेशल गाड्यांच्या फेऱ्या जाहीर केल्या आहेत. मात्र मुंबईतील पश्चिम उपनगरात राहणाऱ्या कोकणवासियांचा विचार करता तसेच यापूर्वी अनेक वर्षे सुरू असलेली दादर रत्नागिरी पॅसेंजर गाडी कोरोना काळापासून पासून दिव्यातूनच रत्नागिरीला येत असल्यामुळे पश्चिम उपनगरातील कोकणवासीय जनतेची गैरसोय होत आहे. त्यामुळे खास गणेशोत्सवासाठी रत्नागिरीपर्यंत चालवण्यात येणारी मेमू स्पेशल गाडी दिव्या ऐवजी दादर वरून रत्नागिरीपर्यंत चालवावी, अशी कोकण वर्षांची मागणी आहे


मेमू स्पेशल गाडीसह कोकण रेल्वे मध्य रेल्वेच्या सहयोगाने गणेशोत्सवासाठी गणपती विशेष गाड्यांच्या 156 फेऱ्या जाहीर केल्या आहेत. केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांनी कोकणवासीयांना यंदाच्या गणेशोत्सवासाठी पुरेपूर गाड्या सोडल्या जातील, असे आश्वासन दिले होते. त्यानुसार रेल्वेने गणेशोत्सवातील याआधी च्या सर्व गाड्यांचे आरक्षण फुल्ल झाल्यामुळे सप्टेंबरमध्ये होणाऱ्या गणेशोत्सवासाठी गणपती स्पेशल गाड्यांच्या आणखी फेऱ्या जाहीर केल्या आहेत.

यंदा प्रथमच दिवा ते रत्नागिरी मार्गावर धावणारी मेमू स्पेशल गाडी 01153/01154 या क्रमांकासह धावणार आहे. दि. 13 सप्टेंबर ते 2 ऑक्टोबर 2023 या कालावधीत या गाडीच्या 39 फेऱ्या होणार आहेत. ही गाडी रोज धावणार आहे. सकाळी सात वाजून दहा मिनिटांनी ही गाडी दिवा स्थानकातून रत्नागिरीला ती दुपारी २ वाजून ५५ मिनिटांनी पोहोचेल. परतीच्या प्रवासात ही गाडी दुपारी तीन वाजून 40 मिनिटांनी सुटून त्याच दिवशी रात्री १० वाजून ४० मिनिटांनी ती दिवा जंक्शनला पोहोचेल.

दिवा- रत्नागिरी मेमू स्पेशल गाडीचे थांबे


रोहा, माणगाव, वीर, खेड, चिपळूण, सावर्डे, आरवली व संगमेश्वर रोड. यंदाच्या गणेशोत्सवात रत्नागिरी पर्यंत प्रथमच धावणाऱ्या गणपती स्पेशल मेमू गाडीला एकूण बारा डबे जोडले जाणार आहेत

Digi Kokan
Author: Digi Kokan

Leave a Comment

READ MORE

best news portal development company in india

READ MORE