मुंबई : मुंबई कोल्हापूर मार्गावरील प्रवाशांची अतिरिक्त गर्दी लक्षात घेऊन मध्य रेल्वे छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस, मुंबई ते श्री छत्रपती शाहू महाराज टर्मिनस कोल्हापूर अशी एक मार्गी विशेष चालविणार आहे.
01099 विशेष छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथून दि. 12.08.2023 रोजी (मध्यरात्री) 00.30 वाजता सुटेल आणि त्याच दिवशी 11.30 वाजता श्री छत्रपती शाहू महाराज टर्मिनस कोल्हापूर येथे पोहोचेल.
थांबे: दादर, कल्याण, लोणावळा, पुणे, सातारा, मिरज.
संरचना: एक फर्स्ट कम सेकंड एसी, एक एसी 2 टियर, दोन एसी 3 टियर, 10 स्लीपर क्लास आणि 8 जनरल सेकंड क्लास दोन गार्ड्स ब्रेक व्हॅन्ससह.
आरक्षण: सर्व संगणकीकृत आरक्षण केंद्रांवर आणि www.irctc.co.in या वेबसाइटवर विशेष शुल्कावर विशेष ट्रेन क्र.01099 चे बुकिंग खुले आहे.
