उरण दि १६ (विठ्ठल ममताबादे ) : भारताच्या 76 व्या स्वातंत्र्य दिनाचे औचित्य साधून उरण तालुक्यातील गोवठणे ग्रामपंचायत तर्फे विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात आले होते.
यावेळी विदयार्थ्यांना सन्मान चिन्ह देऊन मान्यवरांच्या हस्ते गौरविण्यात आले.ग्रामपंचायत येथे माजी उपसरपंच तथा ग्रामपंचायत विद्यमान सदस्य समाधान म्हात्रे यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. यावेळी सरपंच प्रणिता म्हात्रे व इतर सर्व ग्रामपंचायत सदस्य तसेच ग्रामस्थ उपस्थित होते.
