रत्नागिरी : ३३ वी महाराष्ट्र राज्य राज्यस्तरीय वरिष्ठ गट तायक्वांदो कयोरोगी पूमसे स्पर्धा दि. 22 व 23 ऑगस्ट 2023 रोजी जळगाव येथे होणार आहे. या राज्यस्तरीय तायक्वांदो स्पर्धेसाठी रत्नागिरी तालुक्यातील शहरातील साळवी स्टॉप नाचणे शाखेतील ओम साई मित्र मंडळ सभागृह कै. अन्नपूर्ण प्रभू कला संगीत विद्यालयामध्ये लहानपणापासून तायकवोंडो मार्शल आर्टचे प्रशिक्षण घेणाऱ्या प्रतीक राजेंद्र पवार याची निवड झाली आहे.
या राज्यस्पर्धेकरिता निवड झाल्या बद्दल तायक्वांडो असोसिएशन ऑफ महाराष्ट्रचे कोषाध्यक्ष व तायक्वांडो स्पोर्ट्स असोसिएशन चे अध्यक्ष वेंकटेश्वर राव कररा, कोषाध्यक्ष शशांक घडशी, सचिव लक्ष्मण कररा, सदस्य संजय सुर्वे व सर्व पदाधिकारी तसेच युवा मार्शल आर्ट तायकवांडो ट्रेनिग सेंटरचे सर्व पदाधिकारी आणि पालक व ओम साई मित्र मंडळ सभागृह आणि कै. अन्नपूर्ण प्रभू कला संगीत विद्यालयाचे अध्यक्ष आनंत आगाशे व सर्व पदाधिकारी यांनी शुभेच्छा दिल्या.
प्रतीकला प्रशिक्षण वर्गाचे मुख्य प्रशिक्षक राम कररा सहप्रशिक्षक तेजकुमार लोखंडे उपप्रशिक्षक अमित जाधव महिला प्रशिक्षिका शशीरेखा कररा यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले. त्याचे सर्व स्तरावरून अभिनंदन होत आहे
