सर्वाधिक तिकीट असलेल्या एक्झिक्यूटिव्ह चेअर कारचे १८ ते २८ ऑगस्टपर्यंतचे आरक्षण फुल्ल!
रत्नागिरी : मडगाव ते मुंबई मार्गावर २७ जून रोजी पंतप्रधानांच्या हस्ते शुभारंभ झालेल्या वंदे भारत एक्सप्रेसला दिवसेंदिवस कोकण रेल्वे मार्गावर प्रतिसाद वाढताना दिसत आहे. गाडीच्या एक्झिक्युटीव्ह चेअर कारच्या बुकिंगला देखील प्रवाशांकडून प्रतिसाद मिळतो आहे. दि. 28 ऑगस्ट पर्यंतच्या मुंबई ते मडगाव मार्गावरील फेऱ्यांसाठी वेटिंग लिस्ट वरील बुकिंग सुरू झाले आहे.
दिनांक 27 जून 2023 रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भोपाळमधून मडगाव ते मुंबई या वंदे भारत एक्सप्रेसच्या उद्घाटन पर गाडीला दूरदृष्टी प्रणालीद्वारे हिरवा झेंडा दाखवला होता.
वंदे भारत एक्सप्रेसचे मुंबई ते मडगाव मार्गावरील एक्झिक्यूटिव्ह चेअर कारचे प्रवास भाडे 3360 रुपये तर चेअर कारचे तिकीट 1815 रुपये आहे. गाडी सुरू झाली तेव्हा वंदे भारत एक्सप्रेसला एक्झिक्यूटिव्ह चेअर कारच्या प्रवासासाठी ते 3360 रुपये मोजावे मोजावे लागत असल्यामुळे काहींनी याची तुलना मुंबई ते गोवा या विमान प्रवासाशी केली होती. वंदे भारतचे प्रवास भाडे इतके असेल तर या गाडीने कोण प्रवास करणार, असा सवाल उपस्थित होत होता. मात्र प्रत्यक्षात या गाडीतील सुविधांचा विचार करता प्रवासीतसेच पर्यटकांनी या गाडीला तिकीटचा विचार न करता पसंती दिल्याचे निदर्शनास आले आहे.
२८ ऑगस्टपर्यंतच्या फेऱ्यांसाठी प्रतीक्षा यादीवरील बुकिंग सुरू
वंदे भारत एक्सप्रेसच्या मुंबई ते मडगाव (ट्रेन क्र. 22229) या प्रवासासाठी एक्झिक्यूटिव्ह चेअर कार या सर्वाधिक तिकीट असलेल्या आसन श्रेणीसाठी बुकिंग फुल्ल झाल्यामुळे आय आर सी टी सी वर या गाडीसाठी 28 ऑगस्ट पर्यंतच्या फेऱ्यांसाठी प्रतीक्षा यादीवरील आरक्षण सुरू झाले आहे.
गणेशोत्सवातील फेऱ्यांचे आरक्षणही फुल्ल
मुंबई -मडगाव मार्गावरील वंदे भारत एक्सप्रेसच्या येत्या गणेशोत्सवात दोन्ही बाजूच्या फेऱ्यांसाठी कोकणवासियांकडून चांगला प्रतिसाद मिळाला आहे. विसर्जना आधी तसेच विसर्जनानंतर जवळपास दहा दिवसांचे आरक्षण आधीच फुल झाले आहे.
वंदे भारत एक्सप्रेसला प्रवाशांकडून मिळत असलेल्या प्रतिसाद लक्षात घेऊन या गाडीने प्रवास करणारे प्रवासी हे तिकिटाचा विचार न करता गाडीचा वक्तशीरपणा तसेच गाडीतील सुविधांचा विचार करत असल्याचे निदर्शनास आले आहे. याच कारणामुळे कोकण रेल्वे मार्गावर धावणारी (22229/22230) दिवसेंदिवस प्रवासीप्रिय होत असल्याचे पाहायला मिळत आहे.
हे देखील वाचा : Konkan Railway | दिवा- रत्नागिरी मेमू स्पेशल ट्रेनला आणखी दोन थांबे
Konkan Railway | गणेशोत्सवात चिपळूणसाठी स्वतंत्र मेमू स्पेशल गाडी धावणार!
