ना. रवींद्र चव्हाण यांचे वन विभागाला वृक्ष लागवडीचे आदेश
कोकण विकास समितीची मागणी केली मान्य
मुंबई : मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्गाच्या चौपदरीकरणाच्या कामात हरवलेली नैसर्गिक हिरवाई आणि गारव्याचे गतवैभव परत आणण्यासाठी कोकण विकास समितीने केलेल्या मागणीला यश आले आहे. राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण यांनी कोकणातून जाणाऱ्या या राष्ट्रीय महामार्गाला नैसर्गिक सावलीचे गतवैभव आणण्यासाठी वृक्ष लागवड करण्याचे आदेश वन विभाग व संबंधित यंत्रणांना दिले आहेत. दरम्यान, या संदर्भातील पुढील बैठक मुंबईत 22 ऑगस्ट रोजी सकाळी नऊ वाजता रायगड बंगल्यावर होणार आहे होणार आहे
ना. रवींद्र यांनी दिलेल्या निमंत्रणनुसार दि.१८ ऑगस्ट रोजी सकाळी ९ वाजता सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण यांनी त्यांच्या रायगड निवास स्थानी मुंबई गोवा महामार्ग चौपदरीकरण करताना जुन्या रस्त्याच्या दुतर्फा असलेली नैसर्गिक मोठी झाडे तोडावी लागली त्यामुळे रस्ते परिसर ओसाड झाला, झाडांची सावलीच नष्ट झाल्यामुळे नैसर्गिक गारवा नाहीसा झाला. हा नाहीसा झालेला नैसर्गिक गारवा – सावली अर्थातच कोकणाचे रस्त्याचे नैसर्गिक सौंदर्य पुन्हा प्राप्त व्हावे, यासाठी कोकणच्या मातीत सहज वाढणारी आणि दीर्घ आयुष्य असलेले वड,पिंपळ, किंजळ, उंबर, चिंच, जांभूळ, गुलमोहर, पारिजात,आणि इतर वृक्षांची डिसेंबर महिन्यात चौपदरीकरण काम पूर्ण झाल्यानंतर लागवड करण्याची पूर्वतयारी करण्यासाठी राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण आणि महाराष्ट्र राज्याच्या वन विभागाचे अधिकारी यांची बैठक आयोजित केली होती.
या बैठकीत मंत्री महोदयांनी आजपासूनच दापोलीच्या कोकण कृषी विद्यापीठापासून ते कोकणात असलेल्या नर्सरी केंद्रांना संपर्क करून निदान ३ ते ४ वर्ष जुनी रोपांचा शोध घेऊन कोणतीही हयगय न करता डिसेंबरपर्यंत उपलब्ध होतील या पूर्वतयारीला लागावे, असे आदेश वन खात्याच्या चीफ कन्झर्वेटिव ऑफिसर (आयएफएस) श्री. गोवेकर याना दिले.
या बैठकीत सार्वजनिक बांधकाम प्रादेशिक विभाग, कोकण चे मुख्य अभियंता श्री. शरद राजभोज, राष्ट्रीय महामार्ग ( सां. बा. विभागचे ) ‘मुख्य अभियंता शसंतोष शेलार, अधीक्षक अभियंता श्रीमती तृप्ती नाग, उपअभियंता अकांक्षा मेश्राम, उपअभियंता श्री. पंकज गोसावी, स्वीय सहाय्यक श्री. उत्तम मुळे, एकनाथ घागरे, अनिकेत पटवर्धन, विषयावर सतत पाठपुरावा करणारे आणि चर्चेसाठी मागणी करणारे कोकण विकास समितीचे संस्थापक अध्यक्ष श्री. जयवंत दरेकर आणि त्यांना सक्रियपणे सहकार्य करणारे श्री. श्रीधरकाका कदम त्यांचे सहकारी उदय सुर्वे, संतोष गुरव, राजू मुलुक, ॲड. प्रथमेश रावराणे, शंकर उंबाळकर, शहरिश्चंद्र शिर्के, आणि वृक्षप्रेमी सुनील नलावडे हेही उपस्थित होते.
- हे देखील वाचा : Konkan Railway | दिवा- रत्नागिरी मेमू स्पेशल ट्रेनला आणखी दोन थांबे
- Konkan Railway | गणेशोत्सवात चिपळूणसाठी स्वतंत्र मेमू स्पेशल गाडी धावणार!
- Konkan Railway | गणेशोत्सवासाठी दिवा-रत्नागिरी मार्गावर यंदा प्रथमच मेमू स्पेशल धावणार!
