खोपटे पूल ते जेएनपीटी हायवेपर्यंतचा रस्ता त्वरित दुरुस्त करावा


उरण पूर्व विभाग मित्र परिवारची मागणी

उरण(विठ्ठल ममताबादे ) : उरण पूर्व विभाग मित्र परिवार ग्रुप तर्फे खोपटे पुलापासून ते JNPT  हायवे पर्यंत असलेला सिडको अंतर्गत कोस्टल रोड पूर्णपणे खराब झाला आहे तो लवकरात लवकर दुरुस्त करण्यात यावा यासाठी सिडको ऑफिस ला पत्रक देण्यात आले.त्या पत्राची दखल घेत सिडको चे कार्यकारी अभियंता हनुमंत नहाणे यांनी  लगेचच सिडकोचे अधिकारी निखिल सरक ह्यांना रस्त्याची परिस्थिती पाहण्यासाठी पाठविले.यावेळी उरण पूर्व विभाग मित्र परिवार ग्रुपचे गोरख ठाकूर,खुशाल घरत, मिथुन भगत, मिलिंद भगत व रुपेश पाटील हे उपस्थित होते. लवकरच रस्ता दुरुस्त केला जाईल व रस्ता नव्याने तयार करण्यात येईल असेही अधिकाऱ्यां मार्फत यावेळी सांगण्यात आले.

Digi Kokan
Author: Digi Kokan

Leave a Comment

READ MORE

Pelli Poola Jada

READ MORE