मुंबई : अमेरिकेतील मराठी खासदार मिशिगन हाऊस ऑफ रिप्रेझेन्टेटिव्हचे सदस्य असलेल्या श्रीनिवास ठाणेदार यांनी मंगळवारी महाराष्ट्राचे उद्योग मंत्री उदय सामंत यांची त्यांच्या शासकीय निवासस्थानी सदिच्छा भेट घेतली.
महाराष्ट्रातील उद्योग विश्वाची सद्यस्थिती, औद्योगिक गुंतवणूक आदी विषयांवर चर्चा केली. यावेळी उद्योग मंत्री उदय सामंत यांच्यासोबत सिटी बँकेचे उपाध्यक्ष प्रसाद प्रधान,ओंकार कलवडे उपस्थित होते.
