सुखरूप बाहेर काढण्यात वन विभागाला यश
देवरूख : देवरूखची ग्रामदेवता सोळजाई माता मंदिराजवळ राहणारे पोल्ट्री व्यापारी मंगेश शेट्ये यांच्या विहिरीत सकाळी १०च्या सुमारास बिबट्या पडल्याचे दिसून आले होते. भरवस्ती परिसरात वाघाचा वावर उघड झाल्याने घबराटीचे वातावरण पसरले आहे. या बिबट्याची विहिरीतून सुटका करण्यात आली असून त्याला चांदोली अभयारण्यात सोडण्यात येणार आहे.
मंगेश शेट्ये यांच्या कंपाऊंड मधे रात्रीचेवेळीस भक्ष्याच्या शोधात बिबट्या आला असताना विहीरीत पडला असावा असा अंदाज आहे. शुक्रवारी सकाळी शेट्ये हे पाणी पंप बंद पडल्याने पंप हाऊसजवळ पोहचले व विहिरीतील पाईप पहायला विहीरीत डोकावले असता त्यांना विहीरीत बिबट्या वाघ पडल्याचे दिसले. त्यांनी त्वरीत शेजारी व स्वयंसेवी संस्था व वन विभागाला यांना माहीती दिली. सर्वांना पाचारण करणेत आलेवर वन विभागाच्या पथकाने सर्वाच्या मदतीने वाघाला पिंजर्यात जेरबंद करण्यात यश मिळविले.
साधारण ३ वर्षाचा हा बिबट्या असून त्याचे मानेवर जखम दिसून आली. त्याला पशुवैद्यकीय यांचे निगराणीखाली उपचार सुरू केले आहेत.
बचाव मोहीम रत्नागिरी वन क्षेत्रपाल प्रकाश सुतार यांच्या मार्गदर्शनाखाली राबविणे आली. त्यात विभागीय अधिकारी दीपक खाडे.वनरिमंडळ टी आर. मुल्ला व वनरक्षक सुरज तेली. सुयोग कराडे. संतोष कदम. कंडूकर.स्वयसेवी संस्थेचे राजा गायकवाड. विशाल तळेकर. मया चव्हाण. आदींनी सहभाग घेतला होता.

बिबट्यावर पं. सं. देवरूखचे पशू वैद्यकीय अधिकारी कदम यांनी तपासणी करून उपचार केले. त्यानंतर त्याला चांदोली अभयारण्यात अधिवासात सोडण्यात येणार असल्याचे सुतार यांनी सांगितले.
