कै. मृणाल हेगशेट्ये राज्यस्तरीय वक्तृत्व स्पर्धेचा मानकरी अभय आळशी

कनिष्ठ गटात सोनाली कदम तर माध्यमिक गटात कीर्ती सामंत आणि श्रेया मेस्त्री प्रथम

रत्नागिरी : महाराष्ट्रातील मानाची, नामांकित आणि 4 दशकांची दीर्घ परंपरा असलेल्या कै.मृणाल हेगशेट्ये राज्यस्तरीय आंतर महाविद्यालयीन वक्तृत्व स्पर्धेमध्ये अभय कृष्णकांत आळशी याने मोहोर उमटवली. जिल्हास्तरीय कनिष्ठ गटामध्ये सोनाली मंगेश कदम हिने प्रथम क्रमांक संपादन केला असून जिल्हास्तरीय माध्यमिक गटामध्ये कीर्ती उदय सामंत (इंग्रजी) आणि श्रेया कृष्णा मेस्त्री (मराठी) यांनी प्रथम क्रमांक पटकावला आहे. या वर्षीचा राज्यस्तरीय महाविद्यालयीन गटाच्या सांघिक चषकावर श्रीमान भागोजी शेठ किर महाविद्यालयाने नाव कोरले तर कनिष्ठ महाविद्यालयाचा सांघिक चषक न्यु इंग्लिश स्कुल महाविद्यालयाने पटकावला.

कै. मृणाल हेगशेट्ये आंतर महाविद्यालयीन वक्तृत्व स्पर्धा दरवर्षी महाविद्यालयात आयोजित केल्या जातात. गेली 41 वर्ष ही स्पर्धा सुरू आहे. राज्यातील विविध महाविद्यालयातील विद्यार्थ्यांचा या स्पर्धेत मोठा सहभाग असतो. यावर्षी ही स्पर्धा शनिवार दिनांक 25 आणि 26 ऑगस्ट रोजी मोठ्या उदंड प्रतिसादात माध्यमिक, कनिष्ठ महाविद्यालयीन आणि वरिष्ठ महाविद्यालयीन अशा गटामध्ये स्पर्धा पार पडली. तब्बल 149 विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला.

मृणाल हेगशेट्ये स्मृती आंतर महाविद्यालयीन राज्यस्तरीय स्पर्धेच्या बक्षीस वितरण सोहळ्यात विजेत्या स्पर्धकांना समाज प्रबोधनकार हभप शामसुंदर महाराज, ज्येष्ठ समाजवादी नेत्या कमल ताई परुळेकर, नवनिर्माण शिक्षण संस्थेचे चेअरमन अभिजीत हेगशेट्ये, सेक्रेटरी परेश पाडगावकर, यांच्या हस्ते गौरवण्यात आले. यावेळी प्राचार्या डॉ. आशा जगदाळे, संचालक संचालिका सीमा हेगशेट्ये, ऋतुजा हेगशेट्ये, होते. या स्पर्धेचे परीक्षक म्हणून प्रा. कैलास गांधी, प्रा. अदिती मुळे, लेखिका रश्मी कशाळकर, नथुराम देवळेकर, दीप्ती कानविंदे, प्राचार्य सय्यद अली, अभिजीत बिरनाळे यांनी पाहिले.

स्पर्धेचे विजेते याप्रमाणे
माध्यमिक गट (इंग्रजी माध्यम )
प्रथम-कीर्ती उदय सामंत( एसव्हीएम स्कूल, रत्नागिरी), द्वितीय- रोज मारिया सोजेन कुरिसिंगल (एसव्हीजेसीटी स्कूल,सावर्डे), तृतीय- इशिता कुलीनचंद तावडे (एसव्हीएम स्कूल रत्नागिरी), उत्तेजनार्थ प्रथम- जमील परकार (रोटरी इंग्लिश मीडियम स्कूल खेड), उतेजनार्थ द्वितीय- वैष्णवी विजय नाकाडे (मीनाताई ठाकरे स्कूल साडवली, संगमेश्वर).

माध्यमिक गट मराठी माध्यम
प्रथम -श्रेया कृष्णा मेस्त्री( न्यू इंग्लिश स्कूल देवरुख), द्वितीय- विधी सत्यजित कापडी( नवनिर्माण हाय रत्नागिरी), तृतीय- स्वरूपा अंकुश हेंबाडे (एसव्हीजेसीटी सावर्डे), उत्तेजनार्थ प्रथम- बिल्वा गणेश रानडे (जीजीपीएस स्कूल रत्नागिरी) उत्तेजनार्थ द्वितीय- रुजूला जितेंद्र मुळ्ये
(पटवर्धन हायस्कूल रत्नागिरी).

जिल्हास्तरीय कनिष्ठ गट
प्रथम-सोनाली मंगेश कदम (न्यू इंग्लिश स्कूल लांजा) द्वितीय- आदिती मिलिंद जोशी (अभ्यंकर कुलकर्णी जूनिअर कॉलेज रत्नागिरी) तृतीय- आरुषी अमोल साबडे ( रोटरी इंग्लिश स्कूल खेड), उत्तेजनार्थ प्रथम- नैना मंगेश सावंत (ज्ञानदीप स्कूल खेड) उत्तेजनार्थ द्वितीय-रिचा रघुनाथ शेंबेकर (एसव्हीजेसीटी कॉलेज सावर्डे).

राज्यस्तरीय वरिष्ठ गट
प्रथम -अभय कृष्णकांत आळशी (व्ही.जी.वझे कॉलेज मुंबई), द्वितीय- श्रेया उमेश कुलकर्णी (श्री भागोजी शेठ कीर लॉ कॉलेज रत्नागिरी) तृतीय- शिवम संदीप जाधव (एसपी कॉलेज पुणे),उत्तेजनार्थ प्रथम- दिव्या अनंत केळकर (एमआयटी पुणे), उत्तेजनार्थ द्वितीय- वंशिता अजित भाटकर (श्री भागोजी शेठ किर लॉ कॉलेज रत्नागिरी)

Digi Kokan
Author: Digi Kokan

Leave a Comment

READ MORE