रत्नागिरी येथे उद्याही शिबिराचे आयोजन
रत्नागिरी : सध्या डोळ्यांची साथ आल्यामुळे सर्वांनीच डोळ्यांची काळजी घेतली पाहिजे. डोळ्यांसाठी सर्व काही असे ब्रीद सार्थपणे सिद्ध करणाऱ्या इन्फिगो आय केअर हॉस्पीटलने सलग तिसऱ्या महिन्यात त्रिनेत्र फंड्स कॅमेऱ्याद्वारे डोळ्यांच्या पडद्याची तपासणी (रेटिना स्क्रिनींग) करण्याचे ठरवले आहे. उत्तर रत्नागिरीत खेड आणि दक्षिण रत्नागिरीत लांजा व रत्नागिरीत तीन शिबिरे होणार आहेत.
पुरेशा माहितीअभावी अलिकडे मधुमेहाकडे दुर्लक्ष करणाऱ्यांची संख्याही अधिक दिसते. मधुमेहामुळे ४० वर्षांवरील व्यक्तींच्या डोळ्यांवर परिणाम होत असतो. त्यामुळे ४० वर्षे वयावरील व्यक्तींनी रेटिना तपासणी करून घेणे आवश्यक आहे. इन्फिगो हॉस्पीटलचे रेटिना स्पेशालिस्ट डॉ. प्रसाद कामत हे या शिबिरांमध्ये तपासणी करणार आहेत.
गुलमोहोर पार्क, खेड येथे २६ व २७ ऑगस्ट रोजी शिबिर होणार असून त्याकरिता 9137155490 या क्रमांकावर संपर्क साधावा. २९ ऑगस्ट रोजी लांजा येथे शिबिर झाले. रत्नागिरी येथील हॉस्पीटलमध्ये २८, ३० आणि ते ३१ ऑगस्टदरम्यान तपासणी करण्यात येणार आहे. याकरिता 9372766504 या क्रमांकावर नावनोंदणी करावी, असे आवाहन हॉस्पीटलतर्फे केले आहे.
साधारण चाळिशीनंतर शरीरात होणाऱ्या बदलांमुळे सर्वांनीच आपली शारीरिक तपासणी करून घ्यावी. त्यात डोळ्यांची तपासणी अत्यावश्यक आहे. याशिवाय मधुमेह किंवा ब्लडप्रेशर असणाऱ्या रुग्णांनी आणि अचानक दृष्टी कमी झाली असेल तर, सतत चष्म्याचे नंबर बदलत असेल तर, अचानक नजर कमी होणे, पडदा सरकणे किंवा पडद्याला सूज येणे, डोळ्यातील प्रेशर वाढणे, डोळ्यापुढे काळे ठिपके दिसणे, वजा ३ पेक्षा अधिक नंबरचा चष्मा असेल तर अशा रुग्णांनी या शिबिरात रेटिना तपासणी करून घ्यावी, असे आवाहन इन्फिगोचे व्यवस्थापकीय संचालक डॉ. श्रीधर ठाकुर यांनी केले आहे.
अनुभवी डॉ. प्रसाद कामत
डॉ. प्रसाद कामत हे शंकर नेत्रालय चेन्नई येथून विशेष प्रशिक्षित असून त्यांनी २५ हजारहून अधिक डोळ्यांच्या अवघड शस्त्रक्रिया यशस्वीरित्या केल्या आहेत. तसेच २ लाखांहून अधिक रुग्णांवर उपचार केले आहेत. त्यांच्या अनुभवाचा फायदा खेड, लांजा व रत्नागिरी परिसरातील रुग्णांनी घ्यावा.
कोल्हापूर, मुंबईत जायची गरज नाही
डोळ्यामध्ये औषधाचे थेंब घालून डोळ्यांची अंतर्गत व पडद्याची तपासणी रेटिना नेत्रतज्ञ करतात. यामुळे दृष्टीची संभाव्य हानी व अवास्तव खर्च टाळता येऊ शकतो. ही सुविधा कोकणात फक्त इन्फिगो आय केअरच्या खेड, लांजा, रत्नागिरी येथील रुग्णालयांमध्येच उपलब्ध आहे. त्यामुळे रुग्णांना पुणे, मुंबई, कोल्हापूर, सांगलीत जाण्याची गरज नाही.
