‘सून बरसात की धून ‘मध्ये रत्नागिरीतील श्रोत्यांना सांगीतिक मेजवानी!


रत्नागिरी – एकापेक्षा एक सरस गाणी ऐकत रत्नागिरीकरांची संध्याकाळ श्रवणीय झाली. निमित्त होत कोकण कल्चर इव्हेंट आणि महाराजा फाऊंडेशन आयोजित सुन बरसात की धुन या कार्यक्रमाचं.


रत्नागिरीतील तरुण गायक गायिकाना एक व्यासपीठ देत कोकण कल्चर इव्हेंटने रत्नागिरीच्या सांस्कृतिक क्षेत्रात आपल पहिलं पाऊल टाकलं आहे. जयेश मंगल कार्यालय थिबा पॅलेस रोड इथे २७ ऑगस्ट रोजी संध्याकाळी सात वाजता ही संगीत संध्या आयोजित करण्यात आली होती. समस्त रसिक श्रोत्यांनी आवर्जून उपस्थिती लावत या कार्यक्रमाचा आनंद लुटला. हाऊसफुल्ल अस या कार्यक्रमात श्रोत्यांनी टाळ्यांसह वन्स मोअर, रोख बक्षीस देत सर्व कलाकारांच भरभरून कौतुक केलं.
या कार्यक्रमात सतीश राठोड, राजेश जाधव, ओंकार बंडबे, मुसैब बुड्ये, प्रिया सुरेश आणि कश्मिरा सावंत यांनी सुमधुर गीते सादर केली.


साथसंगत करणारे कलाकार – कीबोर्ड – संदीप कर्लेकर आणि ओंकार आंबेरकर, लिड गिटार – मिलिंद गोवेकर आणि वेदांत गिरकर, बासरी – प्रसन्नराज जोशी, बेस गिटार – शैलेश गोवेकर, ऑक्टोpad – गणेश घाणेकर, तबला – राजू धाक्रस, ढोलक – नागराज कांबळे हे होते.कार्यक्रमाला तांत्रिक सहाय्य करताना स्क्रीन – प्रणित शेटे, ध्वनी/प्रकाशयोजना – संदीप कर्लेकर, ध्वनी योजना सहायक – पंकज घाणेकर आणि श्री. काटकर तसचं छायाचित्रण मिहिर फोटो स्टुडिओ यांनी जबाबदारी सांभाळली. या संगीतसंध्येच सूत्रसंचालन सौ. सोनाली संदेश सावंत यांनी केलं.
अत्यंत सुरेल अशा गीतांनी रत्नागिरीतील अनेक कानसेन तृप्त झाले. भविष्यातही रत्नागिरीतील कलाकारांना घेऊन असेच विविधरंगी कार्यक्रम कोकण कल्चर इव्हेंट सादर करणार आहे.

Digi Kokan
Author: Digi Kokan

Leave a Comment

READ MORE

best news portal development company in india

READ MORE