वीर वाजेकर महाविद्यालयाच्या गौरव ठाकूरची रायफल नेमबाजीत चमकदार कामगिरी

उरण दि 3 (विठ्ठल ममताबादे ) : नुकत्याच अहमदाबाद – गुजरात या ठिकाणी पार पडलेल्या 10 व्या पश्चिम विभागीय 10 मिटर एअर पिस्टल -ज्यूनिअर पुरुष(NR) वैयक्तिक (चॅम्पियनशिप )या नेमबाजी प्रकारात कु गौरव ठाकूर या खेळाडूने उल्लेखनीय कामगिरी करून यश संपादन केले आहे. याच कामगिरीच्या जोरावर तो राष्ट्रीय नेमबाजी स्पर्धेसाठी पात्र ठरला आहे.

या पश्चिम विभागीय स्पर्धेत भारतातील महाराष्ट्र, गुजरात, गोवा व मध्यप्रदेश या राज्यातील खेळाडू सहभागी झाले होते.गौरव ठाकूर हा रयत शिक्षण संस्थेच्या वीर वाजेकर महाविद्यालयात तृतीय वर्ष वाणिज्य या वर्गात शिक्षण घेत आहे. या उत्तुंग यशाबद्दल महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ पी जी पवार यांनी गौरव याचे विशेष अभिनंदन केले व त्याचा सत्कार केला.

या प्रसंगी उपप्राचार्य व जिमखानाप्रमुख डॉ. व्ही. एस. महाले, आयकुएसी समन्वयक डॉ. राहुल पाटील,कार्यालयीन प्रमुख श्री दगडे सर, अर्थशास्त्र विभागप्रमुख प्रा राम गोसावी, डॉ सोनावले,

वाणिज्य विभाग प्रमुख प्रा प्रांजल भोईर, बी. एम. एस विभागप्रमुख प्रा. भूषण ठाकूर, प्रा. प्रियांका ठाकूर, प्रा दिव्या ठाकूर, वर्गशिक्षक प्रा गोतपागर, प्रा दीक्षिता म्हात्रे, प्रा चारुशीला भगत, प्रा. देवेंद्र कांबळे, वर्गप्रतिनिधी कु. अग्निशा कडू व इतर सर्व प्राध्यापकांनी कु गौरव ठाकूर याचे अभिनंदन केले व त्याला पुढील राष्ट्रीय स्पर्धेसाठी शुभेच्छा दिल्या.

Digi Kokan
Author: Digi Kokan

Leave a Comment

READ MORE