खेड एसटी बसस्थानकात पिण्याच्या पाण्यासाठी बसवणार दोन कुलर !

 

  • सामाजिक कार्यकर्ते खालीदभाई चौगुले यांच्या माध्यमातून प्रवाशांची गैरसोय टळणार
  • पाण्याची गैरसोय दूर करण्यासाठी जल फाउंडेशनचेही योगदान

खेड : रत्नागिरी जिल्ह्यातील खेड एसटी स्टँडवरून प्रवास करणाऱ्या प्रवाशांसाठी पिण्याची पाण्याची व्यवस्था नसल्याने बहिरवलीचे सुपुत्र सामाजिक कार्यकर्ते खालीदभाई चौगुले यांच्या माध्यमातून बस स्थानकात येत्या गणेशोत्सवापूर्वी दोन कुलर बसवण्यात येणार आहे. बस स्टँडवरील यासाठीची औपचारिकता पूर्ण करण्यात आली आहे.

खेड एसटी बसस्थानकात प्रवाशांच्या पाण्याची गैरसोय होत असल्याने खेड एसटी स्टँडचे प्रमुख नंदकुमार जाधव यांनी तालुक्यातील बहिरवली गावचे समाजसेवक सुपुत्र श्री. खालीद भाई चौगुले तसेच जल फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष नितीन जाधव यांच्याकडे कुलरसंदर्भात विचारणा केली असता हा विषय खालिदभाई यांनी तत्काळ मनावर घेऊन त्या ठिकाणी पिण्याच्या पाण्याचे कुलर बसवण्यासाठी संमती दर्शवली. खालीदभाई यांच्या माध्यमातून या ठिकाणी दोन कुलर बसवले जाणार आहेत.


यातील एक कुलर प्रवाशांच्या सुरक्षेसाठी असलेल्या पोलीस सुरक्षा देण्यासाठी ज्या ठिकाणी काउंटर आहे तिथे तर दुसरा कुलर ज्या ठिकाणी प्रवाशांना सूचना दिल्या जातात त्या ठिकाणी किंवा पेठे हॉटेलच्या बाजूला बसवण्यात येणार आहे फक्त कुलर लावले जाणार नसून या ठिकाणी पाचशे लिटरचा पाणीसाठा करण्यासाठी एक टाकीही बसवली जाणार आहे.

 

गणेशोत्सवापूर्वी याचे काम पूर्ण केले जाणार असून 15 सप्टेंबर रोजी बस स्थानकातील या दोन्ही कुलरची लोकार्पण केले जाणार असल्याचे भैरवले चे सामाजिक कार्यकर्ते खालीदभाई चौगुले तसेच ज्याला फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष नितीन जाधव यांनी सांगितले

Digi Kokan
Author: Digi Kokan

Leave a Comment

READ MORE

best news portal development company in india

READ MORE