ओबीसींवरील अन्यायाविरोधात रत्नागिरीत मंगळवारी आंदोलन


रत्नागिरी महाविकास आघाडी सरकारच्या कारभाराचा निषेध करण्यासाठी आणि ओबीसी वर्गाचे हक्काचे राजकीय आरक्षण परत मिळविण्यासाठी भारतीय जनता पार्टी ओबीसी मोर्चा रत्नागिरीच्यावतीने मंगळवार दि. 31 मे रोजी सकाळी 10ः30 वाजता जिल्हाधिकारी कार्यालय रत्नागिरी येथे धरणे आंदोलन करण्यात येणार
आहे.
ओबीसींवर होणार्‍या अन्यायाचा निषेध महाविकास आघाडी सरकारच्या निष्क्रियतेमुळे ओबीसींच्या राजकीय आरक्षणाचा बळी गेला आहे. मध्यप्रदेश सरकारने कोर्टाने निर्देशित केलेल्या बाबींची पूर्तता करत ओबीसींना त्यांच्या हक्काचे आरक्षण मिळवून दिले. परंतु, महाराष्ट्रातील महाविकास आघाडी सरकार केवळ वसुलीत मग्न असल्याने कोर्टाने निर्देशीत केलेल्या बाबींची तत्परतेने पूर्तता करु शकले
नाहीत.
त्यामुळेच ओबीसींच्या राजकीय आरक्षणाचा हकनाक बळी गेला आहे. या धरणे आंदोलनात बहुसंख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन ओबीसी मोर्चा, भाजपचे रत्नागिरी दक्षिण जिल्हाध्यक्ष अभिजीत शेट्ये यांनी केले आहे.

Digi Kokan
Author: Digi Kokan

Leave a Comment

READ MORE

Pelli Poola Jada

READ MORE