केरळमधील स्पर्धेत उरणच्या योगा विथ पूनम ग्रुपच्या खेळाडूंची बाजी

चौथी ऍथलेटिक्स नॅशनल मास्टर्स गेम्स स्पर्धा

उरण (विठ्ठल ममताबादे ) ::चौथी ऍथलेटिक्स नॅशनल मास्टर्स गेम्स स्पर्धा  तिरुवनंतपुरम केरळ येथे 18 मे ते 22 मे 2022  या दरम्यान संपन्न झाली.या स्पर्धेत भारताचे प्रत्येक राज्यातल्या खेळाडूंनी सहभाग घेतले होते.  विविध राज्यातील तब्बल 5500 खेळाडूंनी यात सहभाग  घेतले होते  . या स्पर्धेत योगा विथ पूनम उरण चे  योग शिक्षिका सहभागी झाले  होते. या खेळाडूंनी उत्तम कामगिरी बजावून सुयश प्राप्त केले आहे .त्यामुळे उरणचे नाव आता सात समुद्र पलीकडे गेले आहे.

शिक्षक राम चौहान यांनी गोळा फेक तृतीय क्रमांक व भालाफेक तृतीय क्रमांक पटकविला आहे.राम चौहान हे उरण एज्युकेशन सोसायटी इंग्लिश मीडियम स्कूल उरण येथे शारीरिक शिक्षक म्हणून कार्यरत आहेत.

  योग शिक्षिका  पुनम चौहान  यांनी 10 किलो मीटर धावणे प्रथम क्रमांक तर 1500  मीटर धावणे या स्पर्धेत तृतीय क्रमांक  पटकविला आहे .पूनम चौहान या उत्तम योगा शिक्षिका आहेत.अशा प्रकारे सुयश प्राप्त केलेल्या या उरण मधील दोन्ही शिक्षकांचे विविध स्तरातून अभिनंदन होत आहे. या दोन्ही खेळाडूंचे सर्वत्र कौतुक होत आहे.

Digi Kokan
Author: Digi Kokan

Leave a Comment

READ MORE

Pelli Poola Jada

READ MORE