Konkan Railway | हुश्य!! सुटलो बुवा एकदाचा!

वाहतूक कोंडीत अडकलेल्या कोकण रेल्वेच्या प्रवाशांची प्रतिक्रिया

अपघातानंतर तब्बल २८ तासांनी वाहतूक सुरु

रत्नागिरी : पनवेलनजीक मालगाडीला झालेल्या अपघातामुळे शनिवारी रात्रीपासून निर्माण झालेल्या वाहतूक कोंडित फसलेल्या कोकण रेल्वेच्या प्रवाशांनी अखेर सुटकेचा नि:श्वास सोडला आहे. शनिवारच्या अपघातानंतर रविवारी सायंकाळी उशिराने रेल्वेची वाहतूक सुरू झाल्याने कोकण रेल्वे मार्गावर मडगावपासून पुढे अगदी पनवेलच्या आधीच्या स्थानकापर्यंत अक्षरशः रांगेने उभ्या असलेल्या गाड्या मुंबईच्या दिशेने हळूहळू मार्गस्थ झाल्या.

पनवेल नजीक मध्य रेल्वेच्या हद्दीत मालगाडी घसरून झालेल्या अपघातामुळे कोकण रेल्वे मार्गावर येणाऱ्या अनेक कोकणातून जाणाऱ्या गाड्यांची वाहतूक विस्कळीत झाली होती. अखेर शनिवारी सायंकाळी 7 वाजून 35 मिनिटांनी ही वाहतूक कोंडी दूर होऊन. अडकलेल्या गाड्या हळूहळू मार्गस्थ झाल्या.

प्रवाशांचा खोळंबा
पनवेल नजीक अपघात होण्याआधीच आपापल्या ठिकाणी जाण्यासाठी रवाना झालेल्या गाड्यांमधील प्रवासी विविध स्थानकांवर थांबलेल्या गाड्यांमध्येच अडकून राहिले होते. यामध्ये अनेकांच्या खाण्यापिण्याचे देखील हाल झाले. अखेर रविवारी सायंकाळी या गाड्या हळूहळू मार्गस्थ झाल्या आणि गाड्यांमध्येच अडकून पडलेल्या प्रवाशांनी सुटलो बुवा एकदाचा, असा सुटकेचा नि : श्वास सोडला.

वाहतूक सुरु ; पण गाड्या विलंबाने
रविवारी सायंकाळी 7 वाजून 35 मिनिटांनी पनवेल नाशिकचा अपघातग्रस्त मार्ग वाहतूक योग्य बनवल्यानंतर रेल्वेची वाहतूक सुरू झाली असली. अजूनही ती पूर्ण क्षमतेने सुरू होण्यास अवधी जाणार आहे.

कोकण रेल्वेच्या अजून तीन गाड्या रद्द

मालगाडीच्या अपघातानंतर रेल्वेच्या विविध झोनच्या अनेक गाड्या रद्द कराव्या लागल्या आहेत. यामध्ये विशेष करून कोकण रेल्वे तसेच मध्य रेल्वेच्या गाड्यांचा समावेश आहे. अपघातानंतर कोकण रेल्वेने आपल्या काही गाड्या रद्द तर काही पुणे मिरज लोंडा मार्गे वळवल्या. आता वाहतूक सुरू झाली असली तरी कोकण रेल्वेने रविवारच्या रात्री अजून तीन एक्सप्रेस गाड्या रद्द केल्या असल्याचे कळविले आहे. त्यामध्ये लोकमान्य टिळक टर्मिनस ते कुडाळ विशेष गाडी तसेच 12134 मंगळुरू मुंबई सीएसटी सुपरफास्ट एक्सप्रेस चा समावेश आहे.

कोकणकन्या तब्बल पावणे आठ तास लेट ; जनशताब्दी वेळेवर तर वंदे भारत एक्सप्रेस अर्धा तास उशिरा

मध्य तसेच कोकण रेल्वे मार्गावरील वाहतूक आता पूर्वपदावर येत असली तरी अपघातानंतरच्या आजच्या तिसऱ्या दिवशी कोकण रेल्वे मार्गावरील गाड्यांचा ‘लेट मार्क’ कायम आहे. मुंबईतून मडगाव पर्यंत येणारी 20 111 ही कोकणकन्या एक्सप्रेस सोमवारी जवळपास सात तास 45 मिनिटे उशिराने धावत होती. मुंबई मडगाव जनशताब्दी एक्सप्रेस मात्र सोमवारी वेळेत धावत होती. त्याचबरोबर मुंबई मडगाव वंदे भारत एक्सप्रेस सोमवारी कोकण रेल्वे मार्गावर धावताना अर्धा तास उशिराने धावत होती. हे कोणाच परिस्थिती पाहता अपघातानंतर कोकण रेल्वेचे बिघडलेले वेळापत्रक पूर्व पदावर येण्यासाठी एक-दोन दिवसांचा कालावधी लागण्याची शक्यता आहे. प्रवाशांनी प्रवासाला निघण्यापूर्वी आपल्या गाडीची सद्यस्थिती पाहून निघावे, असे आवाहन रेल्वे कडून करण्यात आले आहे.

Digi Kokan
Author: Digi Kokan

Leave a Comment

READ MORE

READ MORE