संकष्टी चतुर्थीनिमित्त गणपतीपुळे येथील मंदिरात फुलांची नेत्रदीपक आरास

रत्नागिरी : संकष्टी चतुर्थीनिमित्त गणपतीपुळे येथील मंदिरात श्रींच्या मूर्तीसमोर सोमवारी फुलांची आकर्षक आरास करण्यात आली होती. संकष्टी चतुर्थीनिमित्त विविध ठिकाणाहून आलेल्या भाविकांनी गणरायाचे मनोभावे दर्शन घेतले.

सोमवारी संकष्टी चतुर्थी असल्याने तसेच गणेशोत्सवही पार पडल्याने भाविकांसह पर्यटक मोठ्या संख्येने गणपतीपुळे येथे दाखल झाले होते. सोमवारी संकष्टी चतुर्थीचे औचित्य साधून भाविकांनी दर्शन रांगांमध्ये शिस्तबद्धपणे गणरायाचे दर्शन घेतले. रविवारी दिवसभर मुसळधारेसह कोसळलेल्या पावसाने सोमवारी मात्र विश्रांती घेतल्याने गणपतीपुळ्यात दाखल झालेल्या भाविक तसेच पर्यटकांनी तेथील चौपाटीवर फेरफटका मारण्याचा आनंद घेतला.

सोमवारी संकष्टी चतुर्थीनिमित्त मुख्य पुजारी अभिजीत घनवटकर तसेच त्यांच्या सहकाऱ्यांनी रंगीबेरंगी फुलांची केलेली आरास पाहून भाविकांनी प्रशंसा केली. दर्शनासाठी आलेल्या अनेकांनी बाप्पाचे हे सजवलेलं रुप आपल्या मोबाईल कॅमेऱ्यात बंदिस्त केले.

Digi Kokan
Author: Digi Kokan

Leave a Comment

READ MORE

READ MORE