आंतरमहाविद्यालयीन विभागीय तायक्वांदो स्पर्धेत सई संदेश सावंत हिला सुवर्णपदक


रत्नागिरी – मुंबई विद्यापीठाच्या आंतर महाविद्यालयीन विभागीय तायक्वांदो स्पर्धेत सई संदेश सावंत हिने सुवर्ण पदक पटकावले आहे.


सई सध्या गोगटे जोगळेकर महाविद्यालय रत्नागिरी येथे प्रथम वर्ष कला शाखेत शिकत असून ७३किलो खालील वजनी गटात तिने हे यश मिळवलं. यानंतर सई खालसा कॉलेज येथे ११,१२,१३ ऑक्टोबर २३ रोजी होणाऱ्या आंतर विभागीय स्पर्धेसाठी माटुंगा येथे सहभागी होणार आहे.
या स्पर्धा ५,६,७ ऑक्टोबर २३ रोजी कणकवली कॉलेज कणकवली येथे घेण्यात आल्या.

सई सावंत ही या खेळाच प्रशिक्षण एस आर के तायक्वांदो क्लब मारुतीमंदिर येथे प्रशिक्षक शाहरुख शेख यांच्याकडे घेत असून कणकवली येथील स्पर्धेसाठी महाविद्यालयाचे क्रीडा शिक्षक प्रा. विनोद शिंदे आणि जय भैरी तायक्वांदो क्लबचे प्रशिक्षक मिलिंद भागवत यांनी मार्गदर्शन केलं.

Digi Kokan
Author: Digi Kokan

Leave a Comment

READ MORE