रत्नागिरी : सर्वोच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती भूषण गवई, मुंबई उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश देवेंद्रकुमार उपाध्याय व पालक न्यायमूर्ती माधव जामदार यांचे आज येथील विमानतळावर आगमन झाले. प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश विनायक जोशी, उच्च न्यायालयाचे महाप्रबंधक आर. एन. जोशी, जिल्हाधिकारी एम देवेंदर सिंह, पोलीस अधीक्षक धनंजय कुलकर्णी, मुख्य कार्यकारी अधिकारी कीर्ती किरण पुजार, महाराष्ट्र व गोवा बार कौन्सीलचे सदस्य ॲड. संग्राम देसाई आदींनी पुष्पगुच्छ देऊन त्यांचे स्वागत केले.

पोलीस दलामार्फत न्यायमूर्ती श्री. गवई यांना गार्ड ऑफ ऑनर देण्यात आला. यानंतर पुष्पगुच्छ देऊन त्यांचे स्वागत करण्यात आले. यावेळी अपर जिल्हाधिकारी शंकर बर्गे, प्रांताधिकारी जीवन देसाई, पोलीस उपअधिक्षक विनीत चौधरी आदी उपस्थित होते.
