उरण दि 7 (विठ्ठल ममताबादे ) :
शहिद भगत सिंग नेशनल स्पोर्ट्स मीट 2023, अंतर्गत “7A साईड राष्ट्रीय फुटबॉल स्पर्धा गोवा 2023”, ही स्पर्धा गोव्यात 3 ते 5 ऑक्टोबर या कालावधीत संपन्न झाली. या स्पर्धेत विविध राज्यांतील (महाराष्ट्र, गोवा, गुजरात, पंजाब, मध्य प्रदेश, विदर्भ) असे सहा संघ सहभागी झाले होते. महाराष्ट्राकडून यु.ई.एस. शाळेच्या संघाने 15 वर्षांखालील आणि 13 वर्षांखालील गटात सहभाग घेतला. महाराष्ट्र (यु.ई.एस. स्कूल उरण संघ) ने त्यांच्या गटात दोन संघांना पराभूत करून उपांत्य फेरीत आणि नंतर अंतिम फेरीत प्रवेश केला.
गुजरात संघासोबत फायनल मॅच खूप खडतर होती, पण आमचा 13 वर्षांखालील आणि 15 वर्षांखालील महाराष्ट्राचा संघ इतका चांगला खेळला की दोघांनीही सुवर्णपदके जिंकली, संघाचा आनंद अनंत होता. गोव्यात जिंकणे ही आमच्या मुलांची अनोखी कामगिरी आहे, संघाच्या एक प्रमुख खेळाडु अथर्व निलेश म्हात्रे ह्याला त्याचा उत्तम कामगिरी बद्दल प्लेयर ऑफ टूर्नामेंट अवॉर्ड देऊन गौरविण्यात आले. सर्व खेळाडु, पालक, शिक्षक, यु.ई.एस. शाळेच्या मुख्याध्यापिका व शाळेच्या मॅनेजमेन्ट कडून सर्वत्र ह्या चिमुकल्यांचे कौतुक करण्यात येत आहे. असे संघाचे मुख्य प्रशिक्षक प्रवीण संग्राम तोगरे यांनी सांगितले.
