देवरूख एस.टी. बस आगाराच्या कारभारात सुधारणा

  • गणेशभक्तांचा परतीचा प्रवास सुकर आणि सुसह्य केल्याबद्दल विजय शिंदे यानी कर्मचा-यांचे केले अभिनंदन!

देवरुख दि.९ ( प्रतिनिधी ): देवरूख आगाराच्या कारभारात गणेशोत्सव काळात थोडी सुधारणा झाल्याने प्रवाशांनी समाधान व्यक्त केले आहे. वरिष्ठानी अधिक लक्ष दिल्यास नक्कीच कारभार सुधारेल, असा आशावाद राज्य परिवहन सेवानिवृत्त संघटनेचे महाराष्ट्र प्रादेशिक सचिव विजय शिंदे यांनी व्यक्त केला.

गणपती परतीची जादा वाहतूक अतिशय नियोजनबद्ध करून गणेश भक्तांना वेळेत मुंबईत पोहोचवल्या बद्दल देवरूखचे प्रभारी आगार व्यवस्थापक श्री.मलुष्टे व यांत्रिक कर्मचाऱी, देवरूख जादा वाहतूक करणारे चालक वाहक आणि सर्व टीमचे विजय शिंदे यांनी आगारात जाऊन अभिनंदन केले.कार्यशाळा, देखभाल, स्पेअर पार्ट, अभावी, ब्रेक डाऊन प्रमाण वाढत असल्याने याचा परीणाम वाहतुकीवर होत आहे. स्लीपर कोच बसची कामे योग्य प्रकारे होत नसल्याने बस वाटेत ब्रेक डाऊन रहातात. कार्यशाळा कर्मचाऱ्यांची कमतरता,भासत आहे.

देवरूख आगाराला कायम स्वरुपी आगार व्यवस्थापक असणे गरजेचे असुन विभाग नियंत्रक यानी लक्ष देणे आवश्यक आहे. तसेच सध्या कोल्हापूर मार्गावरील लातूर व बेळगाव या बस बंद आहेत . संगमेश्वर, देवरूख परीसरातून पहीली जाणारी बस ०८.३० वा स़ंगमेश्वर अक्कलकोट अशी जाते . कोल्हापूर हून देवरूख कडे येण्यासाठी दुपारी ३-३० वा.ची अक्कलकोट संगमेश्वर बस आल्यानंतर देवरूखकडे येणारी बस नाही. देवरुख परीसरातून व्यापारी खरेदीसाठी, प्रवासी कामानिमित्त कोल्हापूर येथे जात असतात त्याना ऊशिराची बस नसल्याने गैरसोय होत आहे.

साखरप्यातून संध्याकाळी ७ नंतर देवरूखला येणारी बस नाही. तरी सध्या बंद असणारी सकाळी ०६.३०.वा. संगमेश्वर लातूर बस सुरू करावी. सकाळी १०.००वा. देवरूख नॄहसिंहवाडी परत कोल्हापूरहून सायंकाळी ५-३० वा. बस सोडुन प्रवाशांची होणारी गैरसोय दूर करावी अशी मागणी राज्य परिवहन निवृत्त कर्मचारी संघटनेचे महाराष्ट्र प्रादेशिक सचिव विजय शिंदे यांनी केली आहे. वरीष्ठ याची दखल घेतील अशी आशाही विजय शिंदे यांनी व्यक्त केली आहे.

Digi Kokan
Author: Digi Kokan

Leave a Comment

READ MORE