‘दिवा-सावंतवाडी’मधून ‘ठंडा ठंडा कूल कूल’ प्रवास यापुढेही करता येणार!

गणेशोत्सवात गाडीला जोडलेल्या वातानुकूलित कोचना मुदतवाढ

रत्नागिरी : मडगाव ते सावंतवाडी आणि नंतर पुढे तीच सावंतवाडी ते दिवा दरम्यान चालवण्यात येणाऱ्या मडगाव- सावंतवाडी -दिवा ट्रेनला गणेशोत्सवात जोडण्यात आलेले दोन वातानुकूलित डबे यापुढे कायम ठेवले जाणार आहेत.

सावंतवाडी ते दिवा जंक्शन दरम्यान चालवण्यात येणाऱ्या 10106/10105 या गाडीला 2023 च्या गणेशोत्सवापासून प्रथमच इकॉनॉमी थ्री टायर श्रेणीचे दोन वातानुकूलित डबे जोडण्यात आले आहेत. आधी पॅसेंजर आणि आता एक्सप्रेस म्हणून चालविल्या जाणाऱ्या या गाडीला प्रथमच गणेशोत्सवापासून दोन वातानुकूलित डबे जोडले आहेत. सोमवारी कोकण रेल्वेने दिलेल्या माहितीनुसार पुढील सूचना मिळेपर्यंत या गाडीला जोडण्यात आलेले वातानुकूलित कायम ठेवण्यात आले आहेत.

मडगाव ते सावंतवाडी आणि पुढे सावंतवाडी दिवा या गाडीच्या प्रवासाला अधिक आरामदायी बनवण्यासाठी वातानुकूलित डबे जोडले जावेत अशी मागणी रेल्वेकडे करण्यात आले होती. कोकण रेल्वेने नुकत्याच झालेल्या गणेशोत्सवा त्याची अंमलबजावणी देखील केली. गणेशोत्सवात रेल्वेने जाहीर केल्याप्रमाणे इकॉनोमी थ्री टायर श्रेणीचे दोन डबे 14 ऑक्टोबर 2023 पर्यंत राहतील असे कळवले होते. मात्र आता त्यांना पुढील सूचनेपर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे.

दिवा-सावंतवाडीला जोडण्यात आलेले वातानुकुलीत डबे यापुढेही कायम ठेवण्यात आल्याने प्रवाशांना या गाडीतून आता वातानुकलीत श्रेणीच्या डब्यातून देखील प्रवास करता येणार आहे.

Digi Kokan
Author: Digi Kokan

Leave a Comment

READ MORE