लांजा : क्रीडा व युवा सेवा संचालनालय महाराष्ट्र राज्य पुणे व जिल्हा क्रीडा परिषद व जिल्हा क्रीडा कार्यालय रत्नागिरी यांच्या संयुक्त विद्यमाने लांजा तालुकास्तरीय शालेय तायक्वांदो स्पर्धा लांजा तालुका शारीरिक शिक्षक संघटना व तायक्वॉंदो फिटनेस अकॅडमी लांजा यांच्या सहकार्याने घेण्यात आली.
या स्पर्धेचे उद्घाटन लांजा- राजापूर-साखरपा विधानसभा मतदारसंघाचे आमदार डॉ. राजन साळवी यांच्या हस्ते करण्यात आले. स्पर्धेच्या उद्घाटन प्रसंगी लांजा गटशिक्षणअधिकारी श्री. बंडगर, विस्तार अधिकारी सावंत, उद्योजक मुन्ना खामकर, तायक्वॉंदो फिटनेस अकॅडमी लांजा व उद्योजक किशोर यादव, लांजा तालुका क्रीडा समन्वयक निलेश बागडी,तायक्वॉंदो फिटनेस अकॅडमी सचिव व राष्ट्रीय खेळाडू, प्रशिक्षक, पंच तेजस्विनी विरेंद्र आचरेकर, लांजा तालुका प्रमुख प्रशिक्षक तेजस दत्ताराम पावसकर, सदस्य रोहित कांबळे,तायक्वॉंदो प्रशिक्षक हर्षराज जड्यार व सर्व क्रीडा शिक्षक आणि प्रशिक्षक उपस्थित होते.
या स्पर्धेमद्ये लांजा तालुक्यातील एकूण 70 ते 80 खेळाडूंनी सहभाग घेतला होता. सर्व विजेत्या स्पर्धकांना नगर पंचायत लांजाचे नगर सेवक संजय यादव यांच्या सौजन्याने सुवर्ण पदक, रौप्य पदक, कांस्य पदक देण्यात आले.
या स्पर्धेचे पंच म्हणून नॅशनल पंच तेजकुमार लोखंडे, मयुरी खांबे, शीतल आचरेकर, तेजस्विनी आचरेकर, गौरव खेडेकर यांच्या मार्गदर्शनाखाली स्पर्धा उत्तमरित्या पार पडल्या. तसेच या स्पर्धेतील सुवर्णपदक विजेते खेळाडूंचे 25 व 26 रोजी होणाऱ्या जिल्हास्तरीय शालेय तायक्वॉंदो स्पर्धेकरीता निवड झालेली आहे.














