Konkan Railway | दिवाळीसाठी कोकण रेल्वे मार्गावर १ नोव्हेंबरपासून धावणार फेस्टिवल स्पेशल गाडी

रत्नागिरी : कोकण रेल्वे मार्गावर दिवाळीसाठी त्री-साप्ताहिक विशेष गाडी दि. १ नोव्हेंबर 2023 पासून चालवण्यात येणार आहे.
या संदर्भात कोकण रेल्वेने दिलेल्या माहितीनुसार लोकमान्य टिळक टर्मिनस ते थिवी (01129) ही आठवड्यातून तीन दिवस धावणारी गाडी दिनांक १ नोव्हेंबर 2023 पासून दर बुधवार, शनिवार वार तसेच सोमवारी रात्री दहा वाजून पंधरा मिनिटांनी सुटेल. मुंबईतून सुटलेली ही गाडी दुसऱ्या दिवशी सकाळी दहा वाजता गोव्यात थीवीला पोहोचेल.
परतीच्या प्रवासात ही गाडी (01130) थिवी ते लोकमान्य टिळक टर्मिनस अशी धावताना दिनांक 2 नोव्हेंबर 2023 पासून गुरुवार, शनिवार तसेच मंगळवारी धावणार आहे. ही गाडी थिवी स्थानकावरून दुपारी तीन वाजता सुटून दुसऱ्या दिवशीच्या पहाटे चार वाजून पाच मिनिटांनी ती मुंबईत लोकमान्य टिळक टर्मिनसला पोहोचणार आहे.

फेस्टिवल स्पेशलचे थांबे

ठाणे, पनवेल, रोहा, माणगाव, वीर, खेड, चिपळूण, संगमेश्वर, रत्नागिरी, आडवली, विलवडे, राजापूर रोड, वैभववाडी, नांदगाव, कणकवली, सिंधुदुर्ग, कुडाळ आणि सावंतवाडी.
Digi Kokan
Author: Digi Kokan

Leave a Comment

READ MORE

READ MORE